शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत नळजोडांना आता ‘अभय’, इंदापूर नगर परिषदेची योजना , लाभ घेण्याचे नगराध्यक्षांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 02:36 IST

इंदापूर : अनधिकृत नळजोड अधिकृत करून घेण्यासाठी इंदापूर नगर परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाºया अभय योजनेचा लाभ जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी ...

इंदापूर : अनधिकृत नळजोड अधिकृत करून घेण्यासाठी इंदापूर नगर परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाºया अभय योजनेचा लाभ जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा अंकिता शहा, मुख्याधिकारी रामनिवास झंवर व पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष अमर गाडे, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख सहदेव व्यवहारे यांनी केले आहे.ते म्हणाले, की शहरातील एकूण मालमत्ताधारकांची संख्या साधारणत: आठ हजार आहे. त्या तुलनेत नळजोड अत्यंत कमी आहेत. ही आकडेवारी व्यस्त व असमाधानकारक असल्याचे नगरसेवकांच्या निदर्शनास आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर चालविण्यात येणारा पाणीपुरवठा विभाग त्यामुळे सतत तोट्यातच चालवावा लागत आहे. या विभागाचा खर्च भागविणे नगर परिषदेला अवघड होत चालले आहे.पाणीपुरवठा विभागाचे उत्पन्न वाढविणे व पाण्याची चोरी, त्याचा अपव्यय टाळण्याकरिता अधिकृत नळांची संख्या वाढविण्याचा निर्णय नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे, असे सांगून ते म्हणाले, की नगर परिषदेचे मूळचे क्षेत्र व वाढीव हद्दीत नगर परिषदेची तपासणी पथके प्रत्येक घरोघरी फिरून मालमत्तेमध्ये असणाºया व नसणाºया नळजोडांची, मालमत्तेची माहिती घेत आहेत. मालमत्तेमध्ये नळजोड घेण्याची सूचना करीत आहेत. ज्या मालमत्ताधारकाकडील नळजोड अनधिकृत आहेत त्यांचे नळजोड अधिकृत करून घेण्यासाठी नगर परिषदेने, आठ दिवसांची अभय योजना राबविण्याची सूचना पाणीपुरवठा विभागास केली आहे. अवैध नळजोडधारकांनी आपले नळजोड अधिकृत करून घ्यावेत. त्यासाठी नगर परिषदेने आठ दिवसांची मुदत दिलेली आहे.या मुदतीत जे अनधिकृत नळजोडधारक आपले नळजोड अधिकृत करून घेणार नाहीत. त्यांच्या घरी जाऊन नळजोडांची तपासणी करण्यात येणार आहे.ते किती व्यासाचे आहे. केव्हापासून अनधिकृत आहे, याचा तपशील गोळा करण्यात येणार आहे. पंचनामा करून संबंधित अनधिकृत नळजोडधारकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यानंतर ते नळजोड अधिकृत करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.मीटर बसवणारमहाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक नळजोडाला मीटर बसविण्याची मोहीम चालू करण्यात येणार आहे. त्यामध्ये अधिकृत असणा-या नळजोडांचा विचार होणार आहे. जे अनधिकृत नळजोडधारक या शोध मोहिमेतून राहतील किंवा स्वत:हून माहिती देणार नाहीत. अशांचे नळजोड बेकायदेशीर असल्याचे उघड झाल्यास, चोरून पाण्याचा वापर करणे अथवा अनधिकृत नळजोडांना पायबंद घालण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले....तर गुन्हे दाखल करणारथकबाकीपोटी तोडलेले नळजोड विनापरवाना जोडून घेतले आहेत, त्यांच्यावर पाणीचोरी करणे, नगर परिषदेच्या मालमत्तेचे नुकसान करणे असे गुन्हे दाखल करण्यात येतील. त्यांच्याकडून पाणी वापरत असल्याचे व घर बांधकाम चालू केल्याच्या दिवसापासून नळजोड पाणी वापराच्या बिलाच्या दहापट रक्कम वसूल केली जाईल. ही कटू कारवाई टाळण्यासाठी अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे