अभय गाडगीळ रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर
By Admin | Updated: July 2, 2017 03:16 IST2017-07-02T03:16:05+5:302017-07-02T03:16:05+5:30
रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून अभय गाडगीळ यांनी शनिवारी माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रशांत देशमुख यांच्याकडून

अभय गाडगीळ रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून अभय गाडगीळ यांनी शनिवारी माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रशांत देशमुख यांच्याकडून पदभार स्वीकारला. पुढील एक वर्ष ते रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून काम पाहतील.
यावेळी बोलताना गाडगीळ यांनी रोटरी डिस्ट्रिक ३१३१ करणार असलेल्या कामांची माहिती दिली. नजीकच्या भविष्यातील डिस्ट्रिक्ट ३१३१ हे नवक्षितिज या संस्थेच्या मदतीने स्वमग्न मुलांसाठी काम करेल. याबरोबरच शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम, वॉश इन स्कूल कार्यक्रमाद्वारे शाळांमध्ये आरोग्य स्वच्छतेविषयक जागृती निर्माण करणे, माय रोटरी, वन रोटरी’ या अंतर्गत देशातील सर्व रोटरी डिस्ट्रिक्ट जोडणे यांचा समावेश असणार आहे. याबरोबरच पेपरमुक्त डिस्ट्रिक्ट करण्यावर आमचा विशेष भर असेल, असे गाडगीळ यांनी सांगितले.