शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

अभय भुतडा फाऊंडेशनकडून शिवसृष्टीला आणखी 75 लाख रुपयांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 18:31 IST

महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि शिवसृष्टी प्रकल्पाचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी सीए अभय भुतडा यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली

पुणे शिवसृष्टी थीम पार्कला पूर्वी दिलेल्या 50 लाख रुपयांच्या देणगीमुळे पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊ लागल्यानंतर, अभय भुतडा फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष अभय भुतडा यांनी शिवसृष्टीला 75 लाख रुपयांची अतिरिक्त मदत दिली आहे.

अभय भुतडा फाऊंडेशनने थीम पार्कला आणखी 75 लाख रुपयांची मदत केली आहे. यावर्षीच्या सुरुवातीला फाऊंडेशनने 50 लाख रुपये दिल्यामुळे 15 मे ते 15 ऑगस्ट दरम्यान तिकिटाचे दर फक्त 50 रुपये ठेवता आले. या काळात दीड लाखांहून अधिक लोकांनी या सवलतीचा लाभ घेतला. जनतेच्या मोठ्या मागणीनुसार आणि फाऊंडेशनकडून मिळालेल्या या नव्या 75 लाख रुपयांच्या मदतीमुळे आता सवलतीचे तिकिट दर 31 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहेत.

सीए अभय भुताडा हे यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक आहेत. त्यांच्या फाऊंडेशनचा पाठिंबा केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नसून, तो समाजात खऱ्या अर्थाने बदल घडवणाऱ्या उपक्रमांमध्येही सक्रिय असतो. शिवसृष्टीसारख्या समाजाच्या सहभागातून चालणाऱ्या आणि वारसा जपणाऱ्या प्रकल्पांशी हातमिळवणी करून, फाऊंडेशन सांस्कृतिक इतिहास जपण्यासाठी आणि तो सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करते. त्यांच्या योगदानाचा उद्देश समुदायांना सक्षम बनवणे, शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि स्थानिक वारशाचा अभिमान वाढवणे हा आहे. 

शिवाजी महाराजांचा वारसा जपण्यासाठी सीए अभय भुतडा यांचा पाठिंबा

महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि शिवसृष्टी प्रकल्पाचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी सीए अभय भुतडा यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “बँकिंग, फायनान्स आणि विमा क्षेत्रातील ख्यातनाम उद्योजक अभय भुतडा यांनी यापूर्वी त्यांच्या फाऊंडेशनमार्फत शिवसृष्टी प्रकल्पासाठी 50 लाख रुपये दिले होते. या निधीच्या मदतीने आम्ही 15 मे ते 15 ऑगस्ट दरम्यान तिकिटांवर सवलत दिली, ज्यामुळे दीड लाखांहून अधिक लोकांना शिवाजी महाराजांचा काळ अनुभवता आला. जनतेच्या मागणीनुसार आणि अभय भुतडा फाऊंडेशनकडून मिळालेल्या आणखी 75 लाख रुपयांच्या मदतीमुळे आम्ही ही सवलत आता 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अभय भुतडा यांच्या मदतीबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत आणि या देणगीच्या माध्यमातून शिवचरित्र अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

सीए अभय भुतडा हे बँकिंग, फायनान्स आणि विमा क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे आदरणीय उद्योजक व समाजसेवक आहेत. त्यांनी या थीम पार्कला पाठिंबा दिला कारण त्याचा उद्देश शिवाजी महाराजांचा इतिहास कमी खर्चात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे.

अभय भुतडा फाउंडेशन आणि त्याचा प्रभाव

2023 साली स्थापन झालेले अभय भुतडा फाऊंडेशन हे समाजातील वंचित घटकांच्या उन्नती, शिक्षण आणि प्रगतीसाठी काम करते. अल्पकालीन मदतीऐवजी दीर्घकालीन परिणामावर भर देत, प्रत्येक प्रकल्प टिकाऊ आणि मोजता येण्यासारखे परिणाम देईल याची फाऊंडेशन काळजी घेते. सीए अभय भुतडा  यांच्या संपूर्ण निधीतून चालणारे हे फाऊंडेशन बाहेरील देणग्या न घेता शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या उपक्रमांना पाठिंबा देते. अल्पावधीतच, त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी लाखो लोकांच्या जीवनाला स्पर्श केला असून, केवळ मदतच नाही तर प्रेरणा, आशा आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा मार्गही अनेकांना मिळवून दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड