अबब... पुण्यात एक किलो वजनाचा पेरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2015 03:50 IST2015-08-31T03:50:55+5:302015-08-31T03:50:55+5:30
मार्केटयार्डातील फळबाजारात रविवारी छत्तीसगडमधील रायपूर येथून पेरूची आवक झाली. आकाराने मोठा असलेल्या या पेरूचे वजन एक किलोपेक्षा जास्त भरते

अबब... पुण्यात एक किलो वजनाचा पेरू
पुणे : मार्केटयार्डातील फळबाजारात रविवारी छत्तीसगडमधील रायपूर येथून पेरूची आवक झाली. आकाराने मोठा असलेल्या या पेरूचे वजन एक किलोपेक्षा जास्त भरते. त्यामुळे हा पेरू ग्राहकांचे आकर्षण ठरत आहे.
मागील काही वर्षांपासून रायपूर येथील पेरू कमी-अधिक प्रमाणात मार्केटयार्डात विक्रीसाठी येत आहे. यावर्षीही रविवारपासून या पेरूचा हंगाम सुरू झाला. हा पेरू रायपूर येथून थेट मुंबई दाखल झाला असून तेथून पुण्यातील बाजारात आला आहे. रविवारी सुमारे ४०० किलो आवक झाली. एका पेरूचे वजन ६०० ते ११०० ग्रॅमपर्यंत भरत आहे. प्रतिकिलोमागे १०० ते १३० रुपयांनी या पेरूची विक्री झाली. फळविक्रेते तसेच ग्राहकांकडून या पेरूची खरेदी केली जाते. पुढील दोन ते अडीच महिने या पेरूचा हंगाम राहील, असे व्यापारी संदीप कटके यांनी सांगितले. सासवड, खेड शिवापूर परिसरातीलही पेरू विक्रीस येत आहेत. (प्रतिनिधी)