शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अबब..! लष्कराच्या १२ जागांच्या भरतीसाठी तब्बल १० हजाराहून अधिक मुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 19:33 IST

केवळ १२ जागांसाठी प्रवेश पत्र मिळाले नसतानाही १० हजाराहून अधिक मुली आल्याने गोंधळ झाला.

ठळक मुद्देमहिला लष्कर भरतीत गोंधळ : प्रवेश पत्र मिळाले नसतानाही आल्या अनेक मुलीप्रवेश पत्र मिळालेल्याच उमेदवारांनी भरतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन

पुणे/वानवडी : महाराष्ट्र, गुजरात तसेच गोवा विभागासाठी महिलांसाठी मंगळवारी पुण्यात झालेल्या लष्कर भरती दरम्यान केवळ १२ जागांसाठी प्रवेश पत्र मिळाले नसतानाही १० हजाराहून अधिक मुली आल्याने गोंधळ झाला. हडपसर येथील एआयपीटी समोर मोठ्या संख्येने जमत मुलींनी घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, लष्कराच्या वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांनी हस्तक्षेप करत मुलींच्या जमावाला माघारी पाठवले.

लष्कराने महिलांसाठी विशेष भरतीचे आयोजन केले होते. ही भरती गेल्या वर्षी होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनामुळे ही भरती स्थगित करण्यात आली होती. दरम्यान, मुलींकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. तिन राज्यांसाठी १०० पेक्षा अधिक जागा रिक्त होत्या. त्यासाठी ही भरती घेतली जाणार होती. या जागांसाठी तब्बल २२ हजाराहून अधिक अर्ज आल्याची माहिती लष्कराच्या भरती विभागाच्या सुत्रांनी ‘लोकमत’ला दिली. कोरोनामुळे स्थगित झालेली ही भरती प्रक्रिया मंगळवार ते गुरूवार या काळात राबविली जाणार होती. केवळ प्रवेश पत्र मिळालेल्याच उमेदवारांनी भरतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.

भरतीसाठी सोमवारीच रात्री अनेक मुली रेस कोर्स समोरील एआयपीटीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जमल्या होत्या. अनेकांनी प्रवेश द्वारासमोरील मुख्य रस्त्याच्या पदपथावरच रात्र काढली. पुणे विभागासाठी केवळ १२ जागारिक्त होत्या. यासाठी लष्कराने ‘कट ऑफ’ लावत ४५० मुलींनाच भरतीसाठी बोलावले होते. मात्र, प्रवेश पत्र मिळाले नसतानाही भरतीची संधी मिळेल या आशेने तसेच ही भरती प्रक्रिया खुली असल्याचा समज झाल्याने अनेक मुली भरतीसाठी आल्या.

राज्यासह गोवा आणि गुजरात येथून मोठ्या प्रमाणात मुली आल्या. मात्र, लष्करातर्फे केवळ ओळखपत्र देण्यात आलेल्या ४५० मुलींनाच प्रवेश देण्यात आला. यामुळे मोठ्या प्रमाणात जमलेल्या मुलींनी एआयपीटीच्या प्रवेशद्वारासमोर जमत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. प्रवेश न मिळाल्याने अनेक मुलींनी घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. मुली मोठ्या प्रमाणात असल्याने पोलिसांचा बंदोबस्त ही काही करू शकला नाही. वाढता गोंधळ लक्षात घेता लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत ध्वनिक्षेपकावरून मुलींना सुचना केल्या. ओळख पत्र असणाऱ्यांनाच प्रवेश मिळणार असे सांगितल्यावर नाईलाजाने भरतीसाठी आलेल्या अनेक मुलींना हताशपणे पुन्हा माघारी परत जावे लागले.-------भरती प्रक्रियेविषयी अनेक मुली अनिभज्ञलष्कराच्या या भरती प्रक्रियेबद्दल अनेक मुली अनभिज्ञ होत्या. ही सैन्य भरती खुली असल्याचा गैरसमज झाल्याने भरपूर मुली अर्ज न भरता याठिकाणी आल्या. यातील काहींनी अर्ज भरले होते. परंतु त्यांना प्रवेश पत्र मिळाले नाही. तरीसुद्धा भरती होण्याची महत्वाकांक्षा बाळगत याठिकाणी आल्या होत्या. सोबत आलेल्या पालकांना सुद्धा याबाबत काही समजेनासे झाले होते.  

१७ ते २१ वयोगटातील मुलींसाठी असणाऱ्या सैन्य भरतीसाठी २७ जुलै ते ३१ आँगस्ट २०२० च्या दरम्यान अर्ज मागवण्यात आले होते. हे अर्ज केल्यानंतर पात्र उमेदवाराला नोंदणी केलेल्या ई-मेल वर प्रवेशपत्र पाठविण्यात येणार असल्याचे जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले होते. तरीसुद्धा ही खुली भरती असल्याचा समज करुन अमरावती, कुर्रा, उस्मानाबाद, वाशीम, हिंगोली, तुळजापूर अशा विविध भागातून मुली याठिकाणी आल्या होत्या. ही भरती अंबाला, लखनौ, जबलपूर, बेंगलोर, शिलँाग व पुणे या ठिकाणी होत आहे.पुढील दोन दिवस भरती प्रक्रिया सुरु असून अर्ज केल्यानंतर ज्या मुलींना त्यांनी नोंदणी केलेल्या ई-मेल वर प्रवेशपत्र मिळाले आहे, त्यांनीच सैन्य भरती साठी यावे असे आवाहन वानवडी गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी यावेळी केले आहे.-----------लष्करातर्फे महिलांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली होती. यासाठी जवळपास २२ हजार अर्ज आले होते. जागा कमी असल्याने आम्हाला एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवारांना बोलावने शक्य नव्हते. यासाठी ८५ टक्कांचा कट ऑफ लावण्यात आला. त्या नुसार मोजक्याक ४५० महिला उमेदवारांना बोलवण्यात आले होते. मात्र, अनेकांचा गैरसम झाल्याने मोठ्या प्रमाणात उमेदवार आले होते. त्यांची समजुत काढून माघारी पाठवण्यात आले.- कर्नल मनिष करकी (रिक्रुटमेन्ट ऑफीसर)......................

मुलींची सैन्य भरती असल्याची जाहीरात पाहून मी व माझ्या तीन मैत्रिणी पल्लवी मेश्राम, इशा नागपुरे, अश्विनी कुरेकर अमरावती व कुर्रा या भागातून येथे आलो. खुली भरती प्रक्रिया असल्याचे आम्हाला कळाले असल्याने कोणताही अर्ज न भरता पुण्यात आलो. परंतु येथे प्रवेश पत्राशिवाय प्रवेश देण्यास नकार दिला.- मनिषा पवार, अमरावती---आम्ही भरतीविषयक जाहिरात पाहून अर्ज भरला होता. परंतू कोणतेही प्रवेशपत्र आम्हाला लष्कराकडून आले नाही. अर्ज भरल्यामुळे आम्हाला प्रवेश मिळेल, या आशेवर येथे भरतीसाठी आलो. परंतु येथे प्रवेशपत्र मागत असल्याने आमची निराशा झाली आहे.- अंबिका बाळु शिंगे व रेणुका बाळू शिंगे, तुळजापूर.

टॅग्स :PuneपुणेWanvadiवानवडीIndian Armyभारतीय जवान