ऐन निवडणुकीत भाजपात गटबाजी

By Admin | Updated: February 11, 2017 02:28 IST2017-02-11T02:28:46+5:302017-02-11T02:28:46+5:30

महापालिकेची रणधुमाळी रंगात येऊ लागली असतानाच भारतीय जनता पक्षात अंतर्गत धुसफूस आणि गटबाजीला उधाण आले आहे

Aam Aadmi Party elections | ऐन निवडणुकीत भाजपात गटबाजी

ऐन निवडणुकीत भाजपात गटबाजी

पिंपरी : महापालिकेची रणधुमाळी रंगात येऊ लागली असतानाच भारतीय जनता पक्षात अंतर्गत धुसफूस आणि गटबाजीला उधाण आले आहे. जुने विरुद्ध नवे असा वाद सुरू झाला आहे. भोसरी, चिंचवड आणि पिंपरीमध्ये मतदारसंघातील नेत्यांच्या गटबाजीमुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत.
निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. दुसरीकडे भाजपात अंतर्गत गटबाजी दिसून येत आहे. तसेच चिंचवड विरुद्ध पिंपरी विरुद्ध भोसरी असा वाद सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेल्या नेत्यांमुळे जुने
कार्यकर्ते नाराज आहेत. उमेदवारीवाटपात जुन्या कार्यकर्त्यांना डावलल्याने नाराजीचा प्रचंड सूर आहे. भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदाची सूत्रे आमदार लक्ष्मण जगताप यांनी स्वीकारल्यानंतर खासदार अमर साबळे, अ‍ॅड. सचिन पटवर्धन यांच्या एकोप्याने पक्षवाढीस मदत होईल, असे वाटत होते. मात्र, सध्या चित्र वेगळेच दिसत आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Aam Aadmi Party elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.