शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

आई उदे गं...अंबाबाई...! देवीच्या जागरासाठी शहरातील सजली मंदिरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 17:00 IST

संपूर्ण भारतात साजरा होणाऱ्या नवरात्र महोत्सवाची बुधवारी (१० आॅक्टोबर) घटस्थापनेपासून सुरु होत आहे. त्यासाठी शहरातील विविध देवीची मंदिरे सजली आहेत़.

ठळक मुद्देमंदिराच्या आवारात विद्युत रोषणाई, मांडव व रंगबेरंगी कापडाने सजावट विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन घटस्थापनेपासून तर दसऱ्यापर्यंत भाविकांना जोगेश्वरी मातेची नऊ रुपे पाहायला मिळणार

पुणे : संपूर्ण भारतात साजरा होणाऱ्या नवरात्र महोत्सवाची बुधवारी (१० आॅक्टोबर) घटस्थापनेपासून सुरु होत आहे. त्यासाठी शहरातील विविध देवीची मंदिरे सजली आहेत़. या नवरात्र महोत्सवासाठी पुण्यातील देवीच्या मंदिराची तयारी पूर्ण झाली आहे. पुण्याचे ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी मातेच्या मंदिराची साफसफाई करण्यात आली आहे. तसेच मंदिराच्या आवारात विद्युत रोषणाई, मांडव व रंगबेरंगी कापडाने सजावट केली आहे. घटस्थापनेला पहाटे पाच वाजता घट बसवण्यात येणार आहेत. त्यानंतर महापूजा झाल्यावर ६ वाजल्यापासून भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येईल.     घटस्थापनेपासून तर दसऱ्यापर्यंत भाविकांना जोगेश्वरी मातेची नऊ रुपे पाहायला मिळणार आहेत. या नऊ रूपांमध्ये दुसऱ्या माळेला शेषासनी, तिसऱ्या माळेला व्याघरंबरी, चौथ्या माळेला वैष्णवी, पाचव्या माळेला अश्वाअरुडा, सहाव्या माळेला सरस्वती, सातव्या माळेला लक्ष्मी, आठव्या माळेला दुर्गा व दसऱ्याला अँग्री देवी अशा विविध रुपात देवीचे दर्शन घेता येणार आहे. दसऱ्याला १८आॅक्टोबर रोजी तांबडी जोगेश्वरी मातेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.  महालक्ष्मी मंदिरात भव्य रोषणाई        नवरात्रोत्सवात सारसबाग येथील महालक्ष्मी मंदिरात बुधवारी सकाळी साडेसात वाजता बी़व्ही़जी़ संचालक हणंमतराव गायकवाड यांच्या हस्ते पारंपारिक पद्धतीने घटस्थापना करण्यात येणार आहे़. सायंकाळी ६.३० वाजता सहपोलिस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांच्या हस्ते महालक्ष्मी मंदिराच्या आकर्षक विद्युत रोषणाईचे उद्घाटन  होणार आहे. उत्सवाच्या काळात होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती नवरात्रोत्सव प्रमुख संस्थापक विश्वस्त भरत अगरवाल, अ‍ॅड़ प्रताप परदेशी, तृप्ती अगरवाल यांनी दिली़. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरासमोरील रस्त्यावर १५ हजार विद्यार्थ्यांचे सामुहिक सुक्त व अथर्वशीर्ष पठण होणार आहे. याप्रसंगी विद्यार्थ्यांना अल्पोपहार व शालेय वस्तु भेट देण्यात येणार आहे. धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे व  फिनोलेक्स उद्योग समुहाच्या विश्वस्त रितु छाब्रिया व संगीतकार नरेंद्र भिडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.  महिला पोलिसांचा सामुहिक ओटी भरण, महाआरती, अंध, अपंग शिक्षकांच्या हस्ते महालक्ष्मीची आरती करण्यात येणार आहे़. महापालिका महिला सफाई कामगारांचा सत्कार, कन्यापूजन, स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नीचा विशेष सन्मान, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, संस्थांचा सन्मान, ढोल ताशाची प्रात्याक्षिके, अंध शाळेच्या विद्यार्थ्यांची भजनसंध्या असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत़. विजयादशमीच्या दिवशी देवीला खास महावस्त्र (सोन्याची साडी) परिधान करण्यात येणार आहे़. 

टॅग्स :PuneपुणेNavratriनवरात्रीchatushrungi templeचतु:श्रृंगी मंदीर