शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

आधार केंद्र येणार सरकारी जागेत : सरकारचा आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 20:30 IST

तक्रारी वाढल्याने खासगी जागेतील आपले सेवा केंद्रातील सर्व आधार केंद्र सरकारी जागेत स्थलांतरीत केले जाणार आहेत.

ठळक मुद्देनागरिकांची लुबाडणूक टाळण्यासाठी घेतला निर्णय

पुणे : आधार कार्ड काढण्यासाठी अथवा त्यातील चुकीची दुरुस्ती करण्यासाठी अतिरिक्त शुल्क वसुल केले जात असल्याच्या तक्रारी वाढल्याने खासगी जागेतील आपले सेवा केंद्रातील सर्व आधार केंद्र सरकारी जागेत स्थलांतरीत केले जाणार आहेत. राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सचिवांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने केंद्र स्थलांतराचे आदेश महाआॅनलाईनला दिले आहेत.  आधार चालकांनी आपली आधार यंत्रे आणि यंत्रचालकांचे शासकीय जागेत स्थलांतर करावे, त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे. आपले सरकार सेवा केंद्रांमधील यंत्रचालकांना जिल्हा प्रशासनाकडून सरकारी जागा सुचवण्यात येणार असून त्या जागेमध्ये संबंधित आधार यंत्रचालकांना आधारचे काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे केंद्रचालक शासकीय जागेत स्थलांतर करणार नाहीत, अशा आधार यंत्रचालकांकडून आधारची कामे काढून घेण्यात येणार आहेत. या पूर्वी काळ्या यादीत टाकलेले आधार यंत्रचालक आणि सरकारी जागेत स्थलांतर करण्यास नकार देणाऱ्या यंत्र चालकांकडील आधार यंत्रे तत्काळ जिल्हा प्रशासनाकडे जमा केली जातील.  सद्य:स्थितीत ज्या आधार केंद्र चालकांकडे माहिती तंत्रज्ञान विभागाची आधार यंत्रे आहेत परंतु, त्यांचा आधार नोंदणीसाठी वापर करण्यात येत नाही, अशी सर्व आधार यंत्रे जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात येणार आहेत. ही यंत्रे जमा न केल्यास शासकीय मालमत्ता अनधिकृतपणे जवळ बाळगल्याप्रकरणी संबंधित केंद्र्र चालकांवर कायदेशीर कारवाई केली जाणर असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.  

टॅग्स :PuneपुणेAdhar Cardआधार कार्डPoliceपोलिसGovernmentसरकार