पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून आधार हद्दपार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 01:37 PM2018-05-03T13:37:55+5:302018-05-03T13:37:55+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेले आधार केंद्र शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने नागरिकांना याठिकाणी येवून आधारकार्ड विषयक काम करणे सोपे जात होते.मात्र, फर्निचरचे काम सुरू झाल्याने हे केंद्र बंद करण्यात आले आहे.

aadhar card centre shiffted from Pune District Collector office | पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून आधार हद्दपार 

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून आधार हद्दपार 

Next
ठळक मुद्देआधार केंद्र: वैकुंठ मेहता संस्थेच्या परिसरात स्थलांतरितजिल्हाधिकारी कार्यालयातील अधिका-यांना आधारकार्ड विषयक नागरिकांच्या तक्रारी

पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमध्ये फर्निचरचे काम सुरू केल्यामुळे सुमारे पाच महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर सुरू असलेले आधार केंद्र बंद करण्यात आले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या केंद्रात येणे सर्वांना सोईचे होते. मात्र, जिल्हा प्रशासनाने आधार केंद्र हद्दपार करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
केंद्र व राज्य शासनाने स्वीकारलेल्या धोरणामुळे आधारकार्डाला चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे. न्यायालयाने आधारकार्ड विषयी दिलेल्या निर्णयामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या आधारकार्ड केंद्रावरील नागरिकांची गर्दी अजूनही कमी झालेली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेले आधार केंद्र शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने नागरिकांना याठिकाणी येवून आधारकार्ड विषयक काम करणे सोपे जात होते.मात्र, फर्निचरचे काम सुरू झाल्याने हे केंद्र बंद करण्यात आले आहे.
नागरिकांची गरज लक्षात घेवून तात्पुरत्या स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयात आधार केंद्र सूरू करण्यात आले होते. आता हे केंद्र वैकुंठ मेहता राष्ट्रीय सरकारी व्यवस्थापन संस्थेच्या परिसरात सुरू नागरी सुविधा केंद्र सुरू केले जाणार आहे.त्यामुळे याच ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार केंद्र स्थलांतरित करण्यात येणार आहे,असे आधार केंद्र समन्वयक विकास भालेराव यांनी सांगितले. मात्र,जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ए विंग मध्ये फर्निचरचे काम सुरू आहे.मात्र,बी विंगमधील सर्व खोल्या रिकाम्या आहेत. त्यामुळे केवळ फर्निचरच्या कारणामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार केंद्र स्थलांतरीत करणे चूकीचे आहे,अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिका-यांना आधारकार्ड विषयक नागरिकांच्या तक्रारी ऐकाव्या लागतात. त्यामुळे हे केंद्र स्थलांतरीत केले जात असल्याची चर्चा केली जात आहे. मात्र,तक्रारी ऐकूण घेतल्याशिवाय नागरिकांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे हे केंद्र स्थलांतरित करू नये,अशी मागणी नागरिक करत आहे. दरम्यान,आधार केंद्र बंद करण्यापूर्वी नागरिकांना कोणतीही कल्पना दिली नव्हती.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात केवळ भित्तीपत्रके चिटकवण्यात आली होती.त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.
-----------------------
जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या सुरू असलेल्या आधार केंद्राची जागा ही भूसंपादन विभागाची होती. तसेच हे केंद्र कायस्वरूपी सुरू करण्यात आले नव्हते. नागरी सुविधा केंद्रात विविध कारणांसाठी नागरिकांना यावे लागते. त्यामुळे नव्याने सुरू केलेल्या जाणा-या  वैैकुंठ मेहता संस्थेतील नागरी सुविधा केंद्राच्या शेजारीच आधार केंद्र सुरू करण्यात येईल.  - विकास भालेराव, आधार समन्व्यक अधिकारी,पुणे 

Web Title: aadhar card centre shiffted from Pune District Collector office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.