शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरासह जिल्ह्यातील आधार यंत्रे अजूनही ‘निराधार’; अहवाल लवकरच प्राधिकरणाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 13:54 IST

गेल्या पाच महिन्यांपासून शहरासह जिल्ह्यातील आधार केंद्रांचे कामकाज ठप्प असताना अद्याप नादुरुस्त आधार यंत्रांची माहिती घेण्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आधार यंत्रे अजूनही दुरुस्तीआभावी ‘निराधार’ असल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देनादुरुस्त आधार यंत्रे दुरुस्त करण्यासाठी खूप खर्च येणार असल्यास नवीन यंत्रांची मागणी : भालेरावपुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात १९५ आधार केंद्रांची गरज असताना केवळ ७१ केंद्र

पुणे : गेल्या पाच महिन्यांपासून शहरासह जिल्ह्यातील आधार केंद्रांचे कामकाज ठप्प असताना अद्याप नादुरुस्त आधार यंत्रांची माहिती घेण्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आधार यंत्रे अजूनही दुरुस्तीआभावी ‘निराधार’ असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, येत्या गुरुवारी याबाबतचा अहवाल विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडे (युनिक आयडेंटिफिकेशन आॅथोरिटी आॅफ इंडिया) सादर केला जाणार असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.आधार यंत्रदुरुस्तीचे अधिकार स्थानिक पातळीवर मिळवेत आणि खासगी आधार यंत्रचालकांना शासकीय इमारतीत आधारची कामे करण्यास परवानगी द्यावी, असा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाने सादर केला होता. त्याला डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्यता मिळाली होती. मात्र, अजूनही शहर व जिल्ह्यातील आधार यंत्रांच्या दुरुस्तीची कामे झाली नसल्याची माहिती समोर आली. मागील महिन्यात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत याचे पडसाद उमटले होते. दुरुस्तीच्या कामांबाबत शासनाकडून मान्यता मिळालेली असताना अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व तालुक्यांतील नादुरुस्त आधार यंत्रांची माहिती घेलेले नाही. आधारचे समन्वयक विकास भालेराव म्हणाले, ‘‘नादुरुस्त आधार यंत्रे दुरुस्त करण्यासाठी खूप खर्च येणार असल्यास नवीन यंत्रांची मागणी केली जाणार आहे.’’  दुरुस्तीसाठी नाममात्र खर्च येत असल्यास तो खर्च जिल्हा प्रशासनाकडून केला जाईल. तसेच, आधार दुरुस्तीच्या कामात अडचणी आल्यास विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून नियुक्त केलेल्या अभियंत्यांकडूनच दुरुस्तीचे काम केले जाईल.

जिल्हा प्रशासनाचा दावा चुकीचा पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात १९५ आधार केंद्रांची गरज असताना केवळ ७१ केंद्र आहेत. तर, जिल्ह्यात केवळ ५९ आधार केंद्र आहेत. त्यामुळे आधार यंत्रदुरुस्तीचे अधिकार स्थानिक पातळीवर मिळाल्यानंतर आधार केंद्रांत वाढ होईल, असा जिल्हा प्रशासनाने केलेला दावा चुकीचा ठरल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड