शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Pune: नाना पेठेतील टोळी युद्धात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

By नितीश गोवंडे | Updated: October 5, 2023 17:04 IST

याप्रकरणी समर्थ पोलिसांनी गुंड बंडू आंदेकर याच्यासह त्याच्या ६ साथीदारांना अटक केली असून, ३ अल्पवयीन साथीदारांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे...

पुणे : वर्चस्वाच्या वादातून भरदिवसा नाना पेठेत दोन जणांवर आंदेकर टोळीच्या टोळक्याने हातोडा आणि कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना सोमवारी (२ ऑक्टोबर) दुपारी सव्वा चारच्या सुमारास घडली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या निखिल आखाडे (२९, रा. धनकवडी) याच्यावर २५ ते २६ वार झाले होते. उपचारादरम्यान निखिलचा मृत्यू झाला असून, त्याचा मित्र अनिकेत दुधभाते (२७) याच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी समर्थ पोलिसांनी गुंड बंडू आंदेकर याच्यासह त्याच्या ६ साथीदारांना अटक केली असून, ३ अल्पवयीन साथीदारांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंड सोमनाथ गायकवाड सध्या येरवडा करागृहात आहे. त्याच्या टोळीतील सदस्यांचा आंदेकर टोळीसोबत वर्चस्वाचा जूना वाद आहे. सोमवारी संध्याकाळी निखिल आणि अनिकेत दोघे गणेश पेठेतील शितळादेवी मंदिर चौकातून अशोक चौकाकडे जात असताना, आंदेकर टोळीतील सदस्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर भररस्त्यात हल्ला केला.

या हल्ल्यात निखिल आणि अनिकेत गंभीर जखमी झाले होते. हल्ल्यानंतर आरोपींनी शस्त्रे फिरवत बंडु आंदेकर पुण्याचा भाई आहे, असे म्हणत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान निखीलचा गुरूवारी पहाटे मृत्यु झाला. न्यायालयाने आरोपींना ७ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, पुढील तपास समर्थ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी