शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीला विवस्त्र करून मारहाण; व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 13:27 IST

दोन तरुणींचे अपहरण करून खोलीत डांबून ठेवले

पुणे : प्रेमप्रकरणातून तरुणीला पळवून नेल्याने तरुणाच्या बहिणीचे अपहरण करून तिला बेदम मारहाण करण्यात आली. अपहरण केल्यानंतर २४ वर्षांच्या बहिणीला विवस्त्र करून खोलीत डांबून ठेवून मोबाइलवर चित्रीकरण करण्यात आले. आरोपींनी ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी सात जणांच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नंदकुमार माटे, सुंदराबाई माटे, आरती पिंपळे, बाळासाहेब पिंपळे, सागर जगताप, श्रीराम गोसावी (सर्व रा. उरळी कांचन) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित तरुणीच्या बहिणीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

माटे यांच्या नात्यातील तरुणीस तक्रारदार महिलेच्या भावाने पळवून नेल्याचा संशय आरोपींना होता. आरोपींनी तक्रारदार महिला आणि तिच्या बहिणीचे अपहरण केले. माटे यांनी नात्यातील तरुणीचा ठावठिकाणा विचारला. दोघींनी ठावठिकाणा सांगितला नाही. त्यामुळे आरोपींनी दोघींना गजाने मारहाण केली. एका खोलीत त्यांना दोन दिवस डांबून ठेवले. तक्रारदार महिलेच्या बहिणीस विवस्त्र करून तिचे मोबाइलवर चित्रीकरण केले. चित्रीकरण त्यांनी सोशल मीडियावर प्रसारित केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष काळे तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकWomenमहिलाKidnappingअपहरण