शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराच्या आत्महत्येच्या धमकीने तरुणीची लॉजमध्ये आत्महत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 19:35 IST

या प्रकरणी प्रियकराविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे...

पुणे : विषारी औषध पिल्याचा व्हिडीओ मोबाइलवर पाठवून प्रियकराने तरुणीला धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने सासवड रस्त्यावरील एका लाॅजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्रियकराविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अक्षय अरुण जोरे (रा. भेकराईनगर, हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत तरुणीच्या आईने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी कोंढवा भागात राहायला होती. तिचे अक्षयबरोबर प्रेमसंबंध होते. अक्षय तिला लग्नासाठी धमकावत होता. ‘माझ्याशी विवाह न केल्यास मी आत्महत्या करेन,’ अशी धमकी त्याने तिला दिली होती.

अक्षयने मोबाइलवर विषारी ओैषध पिऊन आत्महत्या करत असल्याचा व्हिडीओ तिला पाठविला होता. हा व्हिडीओ पाहून तरुणी घाबरली. अक्षयचा मृत्यू झाल्यास आपल्यावर गुन्हा दाखल होईल, अशी भीती या तरुणीला वाटली. तिने सासवड रोडवरील वडकी भागातील एका लॉजमध्ये खोली घेतली. तेथे तिने खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार समोर आल्यावर लॉज व्यवस्थापकाने लोणी काळभोर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक तरटे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी