शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

Pune: प्रेमासाठी पतीला सोडलेल्या महिलेची प्रियकराने केली हत्या, पुण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 09:23 IST

ही घटना ९ जानेवारी रोजी खराबवाडी येथील स्टोन क्रशरच्या खदानीत घडली....

चाकण (पुणे) : प्रियकराशी लग्न व्हावे, यासाठी तिने पतीला सोडले, पण प्रियकराने दुसऱ्या महिलेशी लग्न करण्याचा घाट घातला. त्यामुळे महिलेने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला. यावरून प्रियकराने महिलेचा खदानीत ढकलून खून केला. ही घटना ९ जानेवारी रोजी खराबवाडी येथील स्टोन क्रशरच्या खदानीत घडली.

देवेंद्रकुमार श्यामलाल लोधी (वय २७ वर्षे रा.खराबवाडी, ता.खेड. मूळ रा.मध्य प्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक विलास गोसावी यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिला आणि आरोपी देवेंद्रकुमार यांचे सन २०१० पासून प्रेमसंबंध होते. सन २०१८ मध्ये महिलेचे लग्न झाले. मात्र, लग्नानंतर ती पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी माहेरी येऊन राहू लागली. त्यानंतर, तिचे देवेंद्रकुमार यांच्यासोबत पुन्हा बोलणे होऊ लागले. दरम्यान, देवेंद्रकुमार याची त्याच्या भावाच्या मेहुणीसोबत लग्नाची बोलणी सुरू झाली.

ही बाब महिलेला समजली असता, तिने ‘लग्न करेन, तर तुझ्यासोबतच करीन, तुझ्यासोबतच राहीन,’ असा देवेंद्रकुमार याच्याकडे तगादा लावला. त्यामुळे तिचा खून करण्याचे ठरवून देवेंद्रकुमार याने तिला गावावरून बोलावून घेतले. दुचाकीवरून तिला खराबवाडी येथील डोंगरावर नेले. त्यानंतर, जवळच असलेल्या स्टोन क्रशरमधील खदानीमध्ये उंचावरून ढकलून दिले. त्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड