शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

योगी आदित्यनाथ यांच्या सभेत गोंधळ घालत महिला पोलिसास शिवीगाळ; आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By नम्रता फडणीस | Updated: December 7, 2024 17:09 IST

याबाबत महिला पोलिस अंमलदाराने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे : भोसरीतील गावजत्रा मैदान येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभास्थळी बॅरिकेटवरून चढून जाताना रोखले असता गोंधळ घालत कर्तव्यावरील महिला शिपायास शिवीगाळ करणार्याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश एस. आर. पहाडे यांनी फेटाळला.

रुतीक लांडगे असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. याबाबत महिलापोलिस अंमलदाराने भोसरीपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 17 नोव्हेंबर 2024 रोजी भोसरी येथील गावजत्रा मैदान येथे सायंकाळी पाचच्या सुमारास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा होती. यावेळी, फिर्यादी त्याठिकाणी कर्तव्य बजावत होत्या. सभास्थळी आलेला आरोपी बॅरिकेटवरून चढून जात असताना फिर्यादी यांनी त्यांना रोखले. यावेळी, त्याने फिर्यादी यांच्या अंगावर धावून जात अश्लील शेरेबाजी करून मनास लज्जा निर्माण होईल असे वक्तव्य केले.याखेरीज, आरोपीसह त्याच्या अन्य साथीदाराने अश्लील हातवारे करीत काही तरी बोलत जोर जोरात हसून निघून गेल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी लांडगे याच्या वतीने न्यायालयात अर्ज करण्यात आला. त्यास जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. आरोपीने सार्वजनिक ठिकाणी मोठ्या जनसमुदाया समोर अश्लील व असभ्य वर्तन केले आहे.अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या सभेच्या ठिकाणी सुरक्षेसाठी लावण्यात आलेले बॅरिकेट अनधिकृतपणे ओलांडून् व्यासपीठाच्या दिशेने जात असताना कर्तव्यावरील महिला पोलिस अंमलदाराने रोखण्याचा प्रयत्न केला असता हा गुन्हा घडला आहे. अतिमहत्वाच्या व्यक्तिजवळ अनधिकृतपणे पोहोचून त्याच्या सुरक्षिततेस धोका निर्माण करण्याचा आरोपीचा उद्देश होता अगर कसे याबाबत सविस्तर तपास करायचा असल्याने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्याची मागणी अॅड. बोंबटकर यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCourtन्यायालयPoliceपोलिसyogi adityanathयोगी आदित्यनाथbhosariभोसरीWomenमहिला