आजी-माजी महिला राष्ट्रपतींची पुण्यात अनोखी भेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 05:39 PM2023-11-30T17:39:18+5:302023-11-30T17:42:21+5:30

राष्ट्रपती आपला पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा पुण्यात आल्याने प्रतिभाताई पाटील ह्यांनी त्यांचे पुणेकरांच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मूर्ती व शाल देऊन गौरविले....

A unique visit of former female President Draupadi Murmu and pratibhatai patil | आजी-माजी महिला राष्ट्रपतींची पुण्यात अनोखी भेट!

आजी-माजी महिला राष्ट्रपतींची पुण्यात अनोखी भेट!

पुणे : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी र्मुमू या सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची भेट घेतली. राष्ट्रपती द्रौपदी र्मुमू यांनी गुरुवारी पुणे येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. राष्ट्रपती आपला पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा पुण्यात आल्याने प्रतिभाताई पाटील ह्यांनी त्यांचे पुणेकरांच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मूर्ती व शाल देऊन गौरविले. 

याप्रसंगी प्रताप परदेशी व डॉ. अविनाश भोंडवे यांनी लिहलेल्या 'बाल रक्षण कायद्याचे (Pocso) अंतरंग' या पुस्तकाची पहिली प्रत राष्ट्रपती यांना प्रदान करण्यात आली. सदर भेटी दरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, ग्रामविकास मंत्री दादा भुसे, ज्योतीताई राठोर, जयेश राठोर, विनित परदेशी आदी उपस्थित होते.

आज राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या उपस्थितीत यंदाचा एनडीएमधील संचलन सोहळा पार पडला. यावेळी तिरंगा ध्वज फडकवत तीन चेतक हेलिकॉप्टर मधून संचलनाला सलामी देण्यात आली. खडकवासला येथील एनडीएच्या खेत्रपाल मैदानावर संचलनासाठी करण्यात आलेली जय्यत तयारी, सोबतीला लष्करी बँड पथकाच्या कदम कदम बढायेजा...सारे जहाँ से अच्छा... विजय भारत...एनडीए गान या गाण्यांच्या तालावर दिलेली सलामी अशा दिमाखदार वातावरणात हा सोहळा गुरूवारी (३० नोव्हेंबर) पार पडला.

Web Title: A unique visit of former female President Draupadi Murmu and pratibhatai patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.