शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Pune | शिंगवेत भीषण अपघात; चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ गाडी थेट नदीपात्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 12:02 IST

ही घटना शुक्रवार दि. १९ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती पारगाव पोलिसांनी दिली...

अवसरी (पुणे) : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पारगाव शिंगवे येथील घोडनदी पात्रात स्कॉर्पिओ गाडी नदीच्या पुलावरून खाली पडून दोन जण जखमी झाले असून स्कॉर्पिओ गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. नशीब बलवत्तर म्हणून दोघे थोडक्यात बचावले. ही घटना शुक्रवार दि. १९ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती पारगाव पोलिसांनी दिली.

वाहन चालक सुरेश गोविंद दाते (वय.५८ - रा काठापूर ता. शिरूर) व नारायण डोके (वय. ५० रा- शिंगवे ता. आंबेगाव ) अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. या पुलाशेजारी दुसऱ्या नवीन पुलाचे काम सुरु असल्याने पुलापासून ३० ते ४० अंतरावर नदीच्या पात्रातील पाणी अडवण्यात आले होते. त्यामुळे पुलाजवळील नदी पात्रात पाणी नव्हते. यामुळे दोघांचे जीव वाचले आहे.              या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंगवेहून सुरेश दाते अष्टविनायक रस्त्यावरुन चारचाकी स्कॉर्पिओ (गाडी नंबर- MH 12 HL 4263 ) ही भरधाव वेगाने घोडनदीवरील पारगावच्या पुलावरून जात होते. वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून चारचाकी स्कॉर्पिओ पुलावरून दोन पलटी मारुन नदी पात्रात कोसळली. यामध्ये वाहन चालक सुरेश दाते गंभीर जखमी झाले आहेत. नारायण डोके हे किरकोळ जखमी झाले. दोघांना खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुलाच्या सुरुवाच्या  ठिकाणी पुलाची उंची कमी असल्याने व पुलाजवळील नदी पात्रात पाणी नसल्याने त्यांचे जीव वाचले.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात