शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो सापांना जीवदान देणाऱ्या सर्पमित्राचा साप चावून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 20:45 IST

विजय छबुराव यादव ( रा. लोणी भापकर ) असे सर्पदंशाने मृत्यु झालेल्या सर्पमित्राचे नाव आहे. लोणीभापकर येथील ते रहिवाशी होते.

पुणे - सुपे दि. १९ ( वार्ताहर ) बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे नजीक असणाऱ्या खराडवाडी येथे  सर्पमित्राला १५ ऑगस्टला विषारी नाग चावल्याने दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज ( शनिवारी ) उपचार घेत असलेल्या सर्पमित्राचा अखेर मृत्यु झाला.         विजय छबुराव यादव ( रा. लोणी भापकर ) असे सर्पदंशाने मृत्यु झालेल्या सर्पमित्राचे नाव आहे. लोणीभापकर येथील ते रहिवाशी होते. बारामती तालुका खरेदी विक्री संघात ते कर्मचारी म्हणुन कार्यरत होते. गेली ३० वर्षापासुन सर्पमित्र म्हणुन विनामोबदला ते समाजात काम करीत होते. खराडवाडी येथील युवराज भापकर यांच्या घरानजीक मंगळवारी ( दि. १५ ) विषारी सर्प निघाल्याची माहिती यादव यांना मिळाली. त्यास पकडण्यासाठी यादव तेथे आले होते. गोठ्यात असलेल्या जनावरांच्या मुरघासाच्या खड्डया जवळच नाग पकडताना यादव यांना सापाने दंश केला. मात्र त्यातुनही त्यांनी स्वत:स सावरुन नागास पकडले, व निर्जन स्थळी सोडुन दिले.        यावेळी यादव बेशुद्धावस्थेत गेल्याने त्यांना  तातडीने उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी त्यांची प्रकृती खालावलेली होती. मात्र दोन दिवसापुर्वी प्रकृती सुधारना होत असताना आज ( शनिवारी ) त्यांचा मृत्यु झाला. यादव यांच्या समोर कोणतीही व्यक्ती असो त्यांना रामराम म्हणण्याची त्यांची एक पद्धत होती. त्यांची हीच पद्धत अनेकांनी अनुकरली होती. त्यांच्या निधनाची माहिती समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :snakeसापBaramatiबारामतीPuneपुणे