शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी सव्वा दहा कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2022 20:58 IST

ग्रामीण बहुल क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत निधी उपलब्ध

सांगवी : बारामती तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकास कामांसाठी सव्वा दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अल्पसंख्यांक विकास विभाग या योजनेतून बारामती तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकासकामांसाठी १० कोटी २० लाख रुपयांची विविध विकासकामे मंजूर केली आहेत. यामुळे बारामती तालुक्यातील विकासकामांना आणखी गती मिळाली आहे.

गावपातळीवरील कब्रस्तान संरक्षण भिंत बांधणे,सुशोभीकरण करणे,शादीखाना बांधणे, सामाजिक सभागृह बांधणे,वस्तीवरील रस्ता व भूमिगत गटारे करणे, अशा विविध कामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. तालुक्यातील जवळपास ३० ते ३५ गावातील कब्रस्तानची कामे मार्गी लागणार आहेत.

राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अनुदान वितरित करण्यास मंजूरी देण्याबाबत ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या अल्पसंख्याक लोकसमुहातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी ग्रामीण क्षेत्र विकास कार्यक्रम कार्यान्वित करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. 

त्यानुसार खासदार,आमदार तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडून शासन मान्यतेसाठी ग्रामपंचायत प्रस्तावांना मंजूरी देऊन सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पित निधी आणि पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीपैकी निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्र विकास योजनेकरिता सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात ५९ कोटी ३६ छत्तीस लाखांचा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला असून पुरवणी मागणीद्वारे १०० कोटी असे एकूण १५९ कोटी ३६  लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार बारामती तालुक्यातील विकासकामांसाठी सव्वा कोटी रुपए मंजूर करण्यात आले आहे. सदर अनुदान संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,सार्वजनिक बांधकाम विभाग,सार्वजनिक बांधकाम जिल्हा परिषद यांच्या स्वाधीन करण्यात आली आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीSocialसामाजिकGovernmentसरकारMONEYपैसा