शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Pune: वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार, आरोपींना अटक

By नितीश गोवंडे | Updated: January 22, 2024 16:56 IST

याप्रकरणी अल्पवयीन मुलाने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, विक्की कांबळे (२४) याला अटक केली आहे...

पुणे : मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर चार जणांनी हल्ला करुन कोयत्याने वार केल्याची घटना पुण्यातील संभाजीनगर येथे घडली. याप्रकरणी सहकारनगरपोलिसांनी एकाला अटक करुन तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार धनकवडी येथे शुक्रवारी (दि. १९) रात्री दहाच्या सुमारास संभाजीनगर येथील हनुमान मंदिराजवळ घडला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाने सहकारनगरपोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, विक्की कांबळे (२४) याला अटक केली आहे. तर तीन अल्पवयीन मुलांना सहकारनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा शुक्रवारी (दि.१९) त्याच्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हनुमान मंदिराजवळ गेला होता. त्यावेळी आरोपी अल्पवयीन मुलांनी फिर्यादी याला आडवून रागाने पाहिले. त्यावेळी फिर्यादी याच्या मित्राने आरोपीला रागाने का बघतो अशी विचारणा केली. याचा राग आल्याने आरोपी व फिर्यादी याच्या मित्रासोबत शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचा राग आरोपीच्या मनात होता.

त्यानंतर २० जानेवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी हनुमान मंदिराजवळ पताका लावत होता. त्यावेळी अल्पवयीन आरोपी व त्याचे इतर साथीदार हातात कोयते घेऊन आले. त्यांनी फिर्यादी याला शिवीगाळ करुन त्याच्या तोंडावर मारले. तसेच इतर आरोपींनी फिर्यादी याच्या डोक्यावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पठारे करत आहेत.

टॅग्स :Sahakar NagarसहकारनगरPoliceपोलिस