शहरं
Join us  
Trending Stories
1
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
2
शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके
3
NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय
4
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
5
'तू इथेच थांब, मी आलेच...'; सख्ख्या भावाच्या हातावर तुरी देऊन बहिणीच्याच नवऱ्यासोबत पळून गेली तरुणी!
6
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
7
'सैयारा' फेम अहान पांडेच्या आगामी सिनेमाची चर्चा, 'ही' मराठी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार?
8
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
9
आता परतीचे दोर नाही, युतीची चर्चा फार पुढे गेलीय; मनसेसोबतच्या युतीवर संजय राऊत असं का म्हणाले?
10
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
11
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
12
गांजा, दारू आणि नको त्या अवस्थेत...; रेव्ह पार्टीवर धाड, तरुण-तरुणींसह ६५ जण पोलिसांच्या ताब्यात
13
Cough Syrup : "लेकाच्या उपचारासाठी रिक्षा विकली, डायलिसिससाठी नव्हते पैसे, ३ लाखांचा खर्च"; वडिलांचा टाहो
14
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
15
विमानात बिघाड झाल्यानंतर सक्रिय होणारा 'RAT' नेमका आहे काय? काय आहे त्यात विशेष? जाणून घ्या...
16
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
17
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
18
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
20
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!

बारावी परीक्षेत कमी गुण तरुणीचे टोकाचे पाऊल, मतपरिवर्तनातून अनर्थ टळला…

By नारायण बडगुजर | Updated: May 8, 2025 18:10 IST

बारावी विज्ञान शाखेची परीक्षा दिलेली १७ वर्षीय तरुणी रिझल्ट पाहण्यासाठी पिंपरीतील महाविद्यालयात गेली. तिला वैद्यकीय शिक्षण घ्यायचे होते.

पिंपरी : बारावीच्या परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे मी आता नदीवर आत्महत्या करण्यासाठी जात असल्याचा फोन मुलीने आईला केला. रिझल्ट पाहण्यासाठी गेलेल्या मुलीचा अशा प्रकारे फोन आल्यामुळे आई हादरली. आईने मुलीला थेट पिंपरी पोलीस ठाण्यात आणले. पिंपरीतील मानवता हिताय सोशल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तरुणीचे मन परिवर्तन केले आणि तिचा आत्महत्येचा विचार डोक्यातून काढून टाकला. बारावी विज्ञान शाखेची परीक्षा दिलेली १७ वर्षीय तरुणी रिझल्ट पाहण्यासाठी पिंपरीतील महाविद्यालयात गेली. तिला वैद्यकीय शिक्षण घ्यायचे होते. मात्र, अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने ती निराश झाली. या नैराश्यातूनच तिने आत्महत्येचा विचार केला. वडील नाहीत, बहीण आणि आई नोकरी करून आपला सांभाळ करत आहेत. त्यातच कमी गुण मिळाले म्हणून तरुणी रडत होती. आपली मैत्रीण रडत असल्याचे पाहून अन्य एका मुलीने तरुणीच्या आईला फोन केला.मी आता नदीवर आत्महत्या करायला जात आहे, असे तरुणीने तिच्या आईला फोनवरून सांगितले. त्यामुळे आईच्या पायाखालची जमीन सरकली. नोकरी करत असलेल्या ठिकाणच्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने तिने मुलीला शोधले. मी आता घरी येणार नाही, असे तरुणी म्हणत होती. त्यामुळे तिच्या आईने मुलीला थेट पिंपरी पोलिस ठाण्यात आणले. ही माहिती मानवता हिताय सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष धनराजसिंह चौधरी आणि उपाध्यक्षा नेहा रोकडे यांना मिळाली. अध्यक्ष चौधरी, उपाध्यक्ष रोकडे, सचिव रजिया शेख, विशाल वाली यांच्यासह संस्थेची समुपदेशन टीम पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल झाली.संस्थेच्या तज्ज्ञ समुपदेशकांनी तरुणीशी संवाद साधला. तिच्या मनातील भावनिक अस्वस्थतेचे मूळ समजून घेतले आणि तिला मानसिक आधार दिला. शिक्षणात अपयश म्हणजे आयुष्य अपयशी झाले असा समज चुकीचा आहे, हे तिला समजावून सांगितले. तिच्या आयुष्यात अनेक सकारात्मक संधी आहेत, हे भान देण्याचा प्रयत्न केला. या साऱ्या संवादातून ती नैराश्यातून बाहेर आली. तिला आत्मभान येऊ लागले. त्यानंतर आत्महत्येचा विचार सोडून ती आईसोबत सुखरूप घरी परतली. या घटनेमुळे केवळ एक जीव वाचवला गेला नाही, तर एका कुटुंबाचा उद्विग्न क्षणही टळला.पिंपरी पोलिस ठाण्याचे अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय घाडगे आणि पोलिस उपनिरीक्षक अनुजा राऊत यांनी संस्थेला या उपक्रमात सहकार्य केले. त्यांनी वेळेवर कृती करत तरुणीला सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना केल्या. पोलिसांनी संस्थेच्या तत्परतेचे कौतुक करत भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांना सहकार्याची ग्वाही दिली.

तरुणाई आपल्या देशाची ताकद आहे. त्यांना मानसिक आरोग्याच्या बाबतीत आधार देणे हे आपले कर्तव्य आहे. शिक्षणात अपयश आले तरी ते अंतिम नाही, हा संदेश आपण सातत्याने देत राहायला हवा. - धनराजसिंह चौधरी, अध्यक्ष, मानवता हिताय सोशल फाउंडेशन

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडexamपरीक्षा