पाण्यात बुडून एका महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 11:46 PM2023-04-25T23:46:03+5:302023-04-25T23:46:32+5:30

तळेगाव दाभाडे येथील नूतन इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी जाधववाडी धरण परिसरात मंगळवारी सायंकाळी ६.३०च्या सुमारास फिरण्यासाठी आले होते.

A college youth died after drowning in water in talegaon Dabhade | पाण्यात बुडून एका महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू 

पाण्यात बुडून एका महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू 

googlenewsNext

तळेगाव दाभाडे: तळेगाव एमआयडीसी जवळील जाधववाडी धरणात बुडून एका महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू झाला. ही दुर्घटना मंगळवारी(दि.२५) सायंकाळी घडली.आदित्य शरद राहणे (वय २१)असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या महाविद्यालयीन युवकाचे नाव आहे. त्याच्या दोन मित्रांना वाचविण्यात सुदुंबरे येथील  एनडीआरएफ पथकाला यश आले आहे. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमाशंकर दिनेश मठपती (वय २१)आदित्य निळे (वय २१)आणि आदित्य शरद राहणे (वय २१) हे तिघे  तळेगाव दाभाडे येथील नूतन इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी जाधववाडी धरण परिसरात मंगळवारी सायंकाळी ६.३०च्या सुमारास फिरण्यासाठी आले होते. तिघे मित्र जाधववाडी धरण पाणलोट क्षेत्रातील पाण्यात उतरले.

मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने आदित्य राहणे हा पाण्यात बुडून मृत झाला. त्याला तळेगाव जनरल हॉस्पिटल येथे दाखल केले असता  उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

Web Title: A college youth died after drowning in water in talegaon Dabhade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.