शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

म्हसोबावाडी दुर्घटनेप्रकरणी विहीर मालकासह कंत्राटदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 13:07 IST

या प्रकरणी विहीर मालक गिरीश क्षीरसागर याला अटक करण्यात आले आहे....

भिगवण (पुणे) : म्हसोबावाडी येथील विहीर दुर्घटना घडून झालेल्या मजुरांच्या मृत्यूबाबत विहीर मालक गिरीश विजय क्षीरसागर तसेच कंत्राटदार विश्वास गायकवाड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. या प्रकरणी विहीर मालक गिरीश क्षीरसागर याला अटक करण्यात आले आहे.

म्हसोबावाडी येथील विहिरीच्या रिंग बांधण्याचे काम सुरु असताना मातीचा ढिगारा ढासळून त्याखाली जावेद अकबर मुलानी, सोमनाथ लक्ष्मण गायकवाड, परशुराम बन्सीलाल चव्हाण, लक्ष्मण मारुती सावंत हे ४ मजूर गाडले गेले होते. मंगळवारी घडलेल्या या घटनेची माहिती त्याच रात्री उशिरा मिळाली होती. भिगवण पोलीस ठाण्यात याची खबर मिळताच त्यांनी तातडीने सर्व प्रशासकीय यंत्रणाना माहिती देत मजुरांच्या शोध कार्याला सुरवात केली होती.

पुण्यातून यासाठी एनडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र अनेक प्रयत्न करूनही कामगारांना जिवंत काढणे प्रशासनाला शक्य झाले नाही आणि जवळपास ७० तास चाललेल्या बचाव आणि शोध पथकाच्या हाती चारही मजुरांचे मृतदेह मिळून आले. यावेळी नातेवाइकांनी मृतदेह ठेवलेल्या रुग्णवाहिकेसमोर लोटांगण घेत न्याय देण्याची मागणी केली. तर विहीर मालक आणि कंत्राटदार याना आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली.

पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाने नातेवाईकांची समजूत काढून या प्रकारणी दोषींवर कठोर शासन करण्याची ग्वाही दिली. याच संदर्भात भिगवण पोलिसांनी विहीर मालक गिरीश क्षीरसागर आणि रिंगचे कंत्राट घेणाऱ्या विश्वास गायकवाड विरोधात याठिकाणी काम करताना मजुरांच्या जीवाला धोका होऊ शकतो याची कल्पना असताना आणि कोणत्याही प्रकारची सुरक्षेच्या बाबींचा उपयोग न केल्यामुळे मजुरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला आहे. तर क्षीरसागर याला तातडीने अटक करण्याची प्रकिया पूर्ण केली आहे.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात