शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

देवेंद्र फडणवीसांची सोशल मीडियावर बदनामी, पुण्यात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 12:43 IST

सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल...

वाघोली (पुणे) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकल्याबद्दल लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस संदीप सातव यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात या संदर्भात फिर्याद दिली आहे.

याबाबत पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस संदिप सातव, हवेली तालुका विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष ओंकार कंद, हवेली तालुका युवा मोर्चाचे सरचिटणीस गौरव झुरूंगे, समीर झुरूंगे यांनी लोणीकंद पोलिसांत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्याचे लेखी निवेदन लोणीकंद पोलिसांना दिले होते.

काय आहे प्रकरण?

लोणीकंद पोलीस ठाण्यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी सोशल मीडिया आयडी धारक अनिल हरपळे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने देवेंद्र फडणवीस यांचा फोटो वापरून एक मिम तयार केले होते. त्यामध्ये आक्षेपार्ह मजकूर टाकला होता. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अधिक तपास लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे करत आहेत.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसLoni Kalbhorलोणी काळभोरCrime Newsगुन्हेगारीHome Ministryगृह मंत्रालयpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड