शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

वारकऱ्यांकडून टोल घेतल्याने पाटस टोल नाक्यावरील चौघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 15:59 IST

शासनाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल...

पाटस (पुणे) : पाटस येथील टोल नाक्यावर वारकऱ्यांकडून नियमबाह्य टोल वसूल करून महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली. याप्रकरणी पाटस टोलनाक्याचे अधिकारी अजयसिंग ठाकूर, सुनील थोरात, विकास दिवेकर, बालाजी वाघमोडे या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर केले होते की, पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहन चालकांकडून टोल वसूल करू नये. याच बरोबरीने यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी देखील लेखी स्वरुपात पाटस टोलनाका प्रशासनाला शासनाच्या परिपत्रकानुसार कळविले होते की, वारकऱ्यांच्या वाहनांकडून टोल वसूल करू नका. तरीदेखील शुक्रवार (दि. ८) रोजी पाटस टोल नाक्यावर वारकऱ्यांच्या वाहनांकडून टोल वसूल केला जात होता. परिणामी टोल नाक्यावरील येथील कर्मचाऱ्यांनी वारकऱ्यांबरोबर हुज्जत घालत टोल वसूल केला.

यावेळी वारकरी भक्त म्हणत होते की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना टोल माफी केली आहे. यावर पाटस टोल नाका येथील कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एकेरी उल्लेख करून टोल माफी विषयी आम्हाला काहीही कळविण्यात आलेले नाही. यावेळी नाईलाज झाल्याने वारकऱ्यांना टोल दिल्याशिवाय पर्याय उरला नव्हता. पाटस टोल नाक्यावरील हुकूमशाहीची वार्ता सर्वत्र पसरल्यानंतर यवत पोलिसांनी टोल नाका प्रशासनाच्या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtollplazaटोलनाकाEknath Shindeएकनाथ शिंदेashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022