शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

नववा आंतरराष्ट्रीय महिला चित्रपट महोत्सव ९ मार्चपासून रंगणार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 19:28 IST

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात येणारा महिला चित्रपट महोत्सव यंदा येत्या शुक्रवारी दि.९ ते ११ मार्च दरम्यान राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे रंगणार आहे. या महोत्सवाचे यंदा नववे वर्ष आहे. 

ठळक मुद्दे कमल हसन आणि श्रीदेवी यांच्या समर्थ अभिनयाने नटलेला ' मुंदरम पिराई' हा तामिळ भाषेतील चित्रपट सायंकाळी पाहायला मिळणार आहे.इट प्रे लव्ह’ या रॅन मर्फी यांनी दिग्दर्शित केलेल्या इंग्रजी चित्रपटाने महोत्सवाचा समारोप होईल.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 'मुंदरम पिराई' तामिळ चित्रपटाचे सादरीकरणपुणे : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात येणारा महिला चित्रपट महोत्सव यंदा येत्या शुक्रवार दि.९ ते ११ मार्च दरम्यान राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे रंगणार आहे. महिला पत्रकारांचा आयाम गट, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि आशय फिल्म क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे यंदाचे हे नववे वर्ष आहे. ' देशविदेशात भ्रमंती करणा-या प्रवासी महिला' ही यंदाच्या महोत्सवाची संकल्पना असून, त्यावर आधारित चित्रपट महोत्सवात सादर करण्यात येणार असल्याची माहिती आयाम ग्रुपच्या मनस्विनी प्रभुणे आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आशय फिल्म क्लबचे सतीश जकातदार आदी उपस्थित होते. या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी दि.९ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. देशविदेशात भ्रमंती करून अनुभवावर प्रवासी ब्लॉग लिहिणा-या रितू हरीश गोयल यांना यावर्षीचा 'आयाम महिला पत्रकार' या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळ्यातच या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर सिडने पोलॅक दिग्दर्शित  'आऊट आॅफ आफ्रिका' हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. प्रख्यात अभिनेत्री मेरिल स्ट्रीप ची यात प्रमुख भूमिका आहे.शनिवारी दि. १० मार्च रोजी सकाळी १० वाजता सॅम मेंडेज दिग्दर्शित  ‘अवे वुई गो' या चित्रपटानंतर या महोत्सवात अंडरे वेल्स यांनी दिग्दर्शित केलेला 'अंडर द टस्कन सन' आणि मार्टिन प्रक्कट दिग्दर्शित ' चार्ली' हा मल्याळम भाषेतील चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. प्रादेशिक भाषांमधील अनेक चित्रपटांमधून अभिनय आणि सौंदर्याच्या बळावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणा-या श्रीदेवी यांनाही महोत्सवात श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. कमल हसन आणि श्रीदेवी यांच्या समर्थ अभिनयाने नटलेला ' मुंदरम पिराई' हा तामिळ भाषेतील चित्रपट सायंकाळी पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या दिवशी रविवारी ११ मार्च रोजी सकाळी १० वाजता इमेन्यूल बरकॉट दिग्दर्शित' आॅन माय वे' हा फ्रेंच चित्रपट, जीन मार्क व्हॅली  दिग्दर्शित ‘वाईल्ड'  हा चित्रपट पाहता येणार आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्री रिव्ह विदर स्पून हिला अकादमी पुरस्कार मिळाला आहे. याच दिवशी टायफूर आयदीन दिग्दर्शित' ब्लॅक क्रो' हा तुर्कीश भाषेतील चित्रपट दाखविला जाणार आहे. ‘इट प्रे लव्ह’ या रॅन मर्फी यांनी दिग्दर्शित केलेल्या इंग्रजी चित्रपटाने महोत्सवाचा समारोप होईल. त्यापूर्वी झेलम चौबळ, शुभदा जोशी,डॉ.अमिता कुलकर्णी,वासंती घैसास आदी महिला आपल्या प्रवासी अनुभवावर उपस्थितांशी संवाद साधणार आहे. संकल्पना, विषय आणि चित्रपट मांडणी याला अनुसरून देशविदेशातील व प्रादेशिक भाषांतील काही गाजलेल्या चित्रपटांची प्रातिनिधिक निवड या महोत्सवासाठी करण्यात आली आहे. सर्व चित्रपटांना इंग्रजीत सबटायटल्स असून, हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य आहे. 

टॅग्स :PuneपुणेPrakash Magdumप्रकाश मगदूमcinemaसिनेमा