शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

देहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के महिला शोधताहेत उपजीविकेसाठी पर्यायी स्त्रोत; ८५ टक्के महिला कर्जबाजारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 11:39 IST

बुधवार पेठ हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे 'रेड-लाइट' क्षेत्र आहे...

ठळक मुद्देदेहविक्रय करणाऱ्या महिलांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या संस्थेअहवालातूनही बाब समोर ८५ टक्के महिला कर्जबाजारी; उत्पन्न घटले

पुणे : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यात देहविक्रय करणाऱ्या महिला देखील भरडल्या गेल्या आहेत. ८५ टक्के महिलांनी मालक, व्यवस्थापक आणि सावकारांकडून कर्ज घेतले आहे. मात्र आता कामाअभावी ते फेडायचे कसे असा प्रश्न देहविक्रय करणाऱ्या महिलांना पडला आहे.त्यामुळे बुधवार पेठ भागातील ९९ टक्के महिला उपजीविकेसाठी पर्यायी स्त्रोतांचा शोध घेत आहेत. आशा केअर ट्रस्ट या देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या संस्थेने केलेल्या पाहणी अहवालातूनही बाब समोर आली आहे.          बुधवार पेठ हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे  रेड-लाइट क्षेत्र आहे.ज्यामध्ये जवळजवळ ७०० वेश्यालय आणि जवळजवळ ३,००० व्यावसायिक महिला कामगार आहेत. या अहवालासाठी या भागातील ३०० (सुमारे १० %) महिलांचा अभ्यास करण्यात आला.  ८७%  महिलांनी सांगितले की साथीचा रोग सर्वत्रयेण्यापूर्वीच त्यांचे उत्पन्न स्वत:सह आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी पुरेसे नव्हते. शिक्षणाची कमतरता आणि रोजगाराच्या कौशल्यांचा अभाव यामुळे उत्पन्नाच्या एका स्त्रोतावरच त्यांना अवलंबून राहाणे भागपडले. बहुतेक महिलांना आता रोजीरोटीचे पर्यायी स्त्रोत शोधायचे आहेत आणित्यांना या व्यवसायापासून दूर जायचे आहे. त्यांच्या दुर्दशाची सखोल माहिती घेऊन, अहवालात देहविक्री करणाऱ्या महिलांच्या अनेक सामाजिक-आर्थिकघटकांचा शोध घेण्यात आला.

यामध्ये ८२ % महिला २५ ते ४५ वर्षे वयोगटातील आहेत. त्यापैकी काही जण अल्पवयीन होत्या, त्यांना सक्तीने देहविक्री करण्यास भाग पाडण्यात आले. ८४ % हून अधिक महिलांचे कोणतेही औपचारिक शिक्षण झाले नाही आणि उर्वरित १६ टक्के महिला माध्यमिक शिक्षण संपण्यापूर्वीच या व्यवसायात आणल्या गेल्या. ९२% महिलांना पुन्हा काम सुरू करण्याची भीती आहे पण उपासमारीच्या भीतीने त्या पंगु झाल्या आहेत. व्यवस्थापकांकडून होणाऱ्या छळामुळे न त्यांना दररोजच्या ब्रेड आणि बटरची चिंता करायला भाग पाडले आहे. ६८% महिलांचा असा विश्वास आहे की येत्या काळात हा व्यवसाय वाढू शकतो. परंतु उर्वरित महिलांना संधी मिळाल्यास पर्यायी रोजगार स्वीकारण्याची इच्छा आहे.----------------------------------------------------------------------------------------------------------अहवालात सुचविण्यात आलेल्या बाबीजिल्हा व राज्य प्रशासन राष्ट्रीय शहरी आजीविका मिशन अंतर्गत महिलांसाठी टेलरिंग, डाटा एन्ट्री, टेलिकॅलिंग, विक्री व विपणन, पॅकेजिंग, उद्योजकताआदी कौशल्यावर आधारित मूलभूत प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे शक्य असल्याचेअहवालात सुचविण्यात आले आहे.-----------------------------------------------------------------------------------------------------------कोव्हिडच्या साथीने या महिलांकरिता पुनर्वसन करण्याची यंत्रणा तयार करण्याची संधी दिली आहे.महिलांना, कर्ज फेडण्यासाठी आणि नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी मदत म्हणून तस्करीग्रस्त पीडित मदत निधी द्यावा. आशा केअर  ट्रस्टच्या नेतृत्त्वाखाली महापौर मुरलीधर मोहोळ यांना स्वयंसेवीसंस्थांच्या प्रतिनिधींचे एक शिष्टमंडळ भेटले. त्यांना अहवाल सादर करण्यात आला आहे. अभ्यासाच्या निष्कर्षांना समर्थन देण्यासाठी त्वरित कारवाई करण्याची विनंती  शिष्टमंडळाने केली आहे

- शैला शेट्टी, अध्यक्षा, आशा केअर ट्रस्ट----------------------------------------------------------------------------------------------------------गेल्या सहा महिन्यांपासून खूप त्रास सहन करावा लागत आहे.  कमाईचा दिवस आणि बचत नसल्यामुळे आम्हाला जगणे कठीण जात आहे. आजवर उपजीविकेचे इतरकोणतेही साधन नसल्यामुळे व्यवसाय सुरू ठेवणे भाग पडले. परंतु कोव्हिडमुळेसंधी मिळाल्यामुळे मी पर्यायी रोजीरोटीची निवड करू इच्छित आहे जेणेकरूनउत्पन्नाचा वेगळा स्त्रोत निर्माण होऊ शकेल- देहविक्रय करणारी एक महिला---------------------------------------------------------------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेProstitutionवेश्याव्यवसायbusinessव्यवसायWomenमहिलाcorona virusकोरोना वायरस बातम्या