पीएमपीचे ९९ कर्मचारी पालिकेच्या मदतीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:12 IST2021-02-25T04:12:42+5:302021-02-25T04:12:42+5:30
पुणे : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालल्याने महापालिकेने रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना शोधण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू केले आहे. ...

पीएमपीचे ९९ कर्मचारी पालिकेच्या मदतीला
पुणे : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालल्याने महापालिकेने रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना शोधण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू केले आहे. त्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकत आहे. पीएमपीएमएल प्रशासनाने पालिकेच्या मदतीसाठी ९९ बदली चालक कर्मचारी वर्ग केले आहेत.
गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव पुण्यात झाला. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण वाढले. पालिकेच्या सर्व यंत्रणांसह आरोग्य व्यवस्थेवर ताण आला होता. मनुष्यबळाअभावी अनेक कामे उशिरा होत होती. त्यामुळे पालिकेने विविध विभागांकडील कर्मचारी आरोग्य विभागाच्या दिमतीला दिले होते. त्यामध्ये पीएमपीएमएलच्या तब्बल साडेचार हजार कर्मचाऱ्यांचा समावेश होता,
आॅक्टोबर महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या घटत गेल्याने या कर्मचा-यांना पुन्हा पीएमपीकडे वर्ग करण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा शहरात नव्याने बाधितांची संख्या वाढू लागल्याने पीएमपीकडून पहिल्या टप्प्यात ९९ कर्मचारी पालिकेला दिले आहेत.