एका दिवसात ९३६ नागरिकांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:11 IST2021-04-11T04:11:34+5:302021-04-11T04:11:34+5:30
खेड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध म्हणून पिंपरी पाईट जिल्हा परिषद गटातील ४५ ...

एका दिवसात ९३६ नागरिकांनी घेतली लस
खेड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध म्हणून पिंपरी पाईट जिल्हा परिषद गटातील ४५ वर्षांपुढील नागरिकांना आधार कार्डची नोंदणी करून लसीकरण करण्यात येत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत असल्याने जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यात येत आहे. हे लसीकरण शिबिर रोज सुरू राहणार आहे.
या लसीकरण शिबिरासाठी करंजविहिरे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री महाजन,पोलीस पाटील संघाच्या जिल्हाध्यक्षा तृप्ती मांडेकर, ग्रामविकास अधिकारी आर. आर. उगले, सरपंच संघमित्रा नाईकनवरे, उपसरपंच लक्ष्मण भालेराव आरोग्य कर्मचारी बोंडे, ग्रा.पं. सदस्य दत्तात्रय मांडेकर, शांताराम चव्हाण, भानुदास दवणे, रुपाली गोणते, माजी सरपंच सुभाष मांडेकर, मुख्याध्यापक मारुती कांबळे यांच्यासह आशावर्कर, शिक्षक, आरोग्यसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे लसीकरणास सहकार्य लाभले.
१० आंबेठाण
आंबेठाण येथे नागरिकांना लसीकरण करताना.