अग्निशामक जवानाचा गणवेश खरेदी करणार ९ हजारांना
By Admin | Updated: May 20, 2015 01:03 IST2015-05-20T01:03:35+5:302015-05-20T01:03:35+5:30
अग्निशामक दलातील ४०७ कर्मचाऱ्यांना गणवेश पुरविण्यासाठी ३८ लाख रुपयांच्या टेंडरला स्थायी समितीकडून गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे.

अग्निशामक जवानाचा गणवेश खरेदी करणार ९ हजारांना
पुणे : अग्निशामक दलातील ४०७ कर्मचाऱ्यांना गणवेश पुरविण्यासाठी ३८ लाख रुपयांच्या टेंडरला स्थायी समितीकडून गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. ५ वर्षांनंतर अग्निशामकच्या जवानांना गणवेश दिला जात असून, त्याकरिता अत्यंत महागडे टेंडर मंजूर करण्यात आले आहे.
मुंबईतील काळबादेवी येथे आगीची दुर्घटना घडून तिघा अधिकाऱ्यांना जीव गमवावा लागल्यानंतर पुण्यातील अग्निशामक जवानांना गणवेश पुरविण्यासाठी गडबडीने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.
अग्निशामकच्या जवानांना गणवेश पुरविण्यासाठी जाहिरात काढली असता ४ टेंडर आले. त्यामध्ये पूनम फर्मचा ३२ लाख ३ हजार, तर विधी ट्रेडिंगचा ३७ लाख ३९ हजार रुपयांची निविदा आली आहे. त्यानुसार त्यांच्याशी करार करून गणवेश पुरविण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला होता. स्थायी समितीच्या बैठकीत ३८ लाख रुपयांचा करार करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पुणे अग्निशामक दलामध्ये २९७ फायरमन, २७ तांडेल, ६० मोटार सारथी, २३ अॅम्ब्युलन्स अटेडन्स अशा ४०७ जवानांना गणवेश पुरविला जाणार असल्याचे करारामध्ये नमूद करण्यात आले आहे.
याबाबत स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांनी सांगितले, ‘‘मागील वेळेस ठेकेदाराने अग्निशामक जवानांना अर्धवट गणवेश पुरविल्याप्रकरणी प्रशासनाला जाब विचारण्यात आला होता. तसेच या वेळी सर्वांना एकाच वेळी संपूर्ण गणवेश पुरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.’’
मागील वेळेस ठेकेदाराने अग्निशामक जवानांना अर्धवट गणवेश पुरविल्याप्रकरणी प्रशासनाला जाब विचारण्यात आला. तसेच या वेळी सर्वांना एकाच वेळी संपूर्ण गणवेश पुरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- अश्विनी कदम,
स्थायी समिती अध्यक्षा
४महापालिकेने २०११ मध्ये निविदाप्रक्रिया राबवून नागपूरच्या एका ठेकेदारास गणवेश पुरविण्याचा ठेका दिला होता.
४जवानांना एका वेळी दोन गणवेशाचे संपूर्ण सेट त्याने पुरविणे आवश्यक होते. मात्र ठेकेदाराने शर्ट, पँट त्यानंतर कोट, बूट असा सुटा गणवेश पुरविला. त्यामुळे काही जवानांना शर्ट, पँट मिळाली पण कोट मिळाला नाही.
४काही जणांना बूट मिळाला, पण टोपी मिळाली नाही. हा गणवेश पुरविण्यास त्याने दीड ते दोन वर्षांचा कालावधी घेतला.