९१ लाखांचा गैरव्यवहार?

By Admin | Updated: September 8, 2016 01:36 IST2016-09-08T01:36:51+5:302016-09-08T01:36:51+5:30

बारामती नगरपालिकेच्या माध्यमातून विद्युत देखभाल दुरुस्तीच्या कामात ९१ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे.

9 lakhs of fraud? | ९१ लाखांचा गैरव्यवहार?

९१ लाखांचा गैरव्यवहार?

बारामती : बारामती नगरपालिकेच्या माध्यमातून विद्युत देखभाल दुरुस्तीच्या कामात ९१ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. नगरपालिकेच्या गोडावूनमधील विद्युत साहित्य बाहेर नेऊन विकले आहे, त्याचे पुरावे आहेत, असा आरोप करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवकांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत
केली होती. त्या वेळी नगराध्यक्षांनी चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा केली. समितीच्या अहवालानुसार कारवाई करण्याची घोषणा केली होती. परंतु आजअखेर चौकशी समितीचा फक्त फार्स
केला आहे. संबंधित विद्युत अभियंत्याला सक्तीच्या रजेवर
पाठवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे.
बारामती नगरपालिकच्या माध्यमातून शहरातील पथदिव्यांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी ठेका दिला जातो. सध्याच्या स्थितीत बारामती शहरातील भूमिगत वीजवाहिन्यांचे काम झाले आहे. त्याचबरोबर नव्याने केलेल्या पथदिव्यांच्या कामातील देखभाल, दुरुस्तीचे काम केलेल्या ठेकेदाराकडेच आहे. जवळपास १४०० पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम संबंधित ठेकेदार करीत आहे. रिंगरोडच्या अंतर्गत असलेल्या पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम बारामती टोलवेज कंपनीकडे आहे. याच अनुषंगाने उर्वरित कामासाठी ठेकेदारी पद्धतीने काम दिले.
बारामती नगरपालिकेच्या विद्युत देखभाल दुरुस्तीच्या कामातील ९१ लाख रुपयांचा गैरप्रकार केला आहे. नगरपालिकेच्या गोडाऊनमधील मीटर बॉक्स नेऊन त्यांची रंगरंगोटी वापरले असल्याचा आरोप सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केला होता. त्याचबरोबर जुने सोडीयम व्हेपर दिवे विकल्याचा आरोप नगरसेवक सुनील सस्ते यांनी केला होता. त्याचा पुरावा असल्याचे सांगताना ज्या टेम्पोमधून या साहित्याची वाहतूक केली, त्याचे नंबरदेखील आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबतच पोलखोल होत असल्याचे निदर्शनास आल्यावर या कामाचे रेकॉर्ड सीलबंद करण्यात आले आहे, असेही या वेळी सांगण्यात आले.
या कामाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी देखील चौकशीची मागणी केली होती. घडलेला प्रकार खरा असल्याचे सांगताना चौकशीतून सत्य बाहेर येईल, असे सांगण्यात आले.
त्या वेळी पक्षाच्या धोरणाविरोधात मत मांडले जात असल्याचे सांगण्यात आले होते.
मात्र, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना या प्रकरणात पक्षाला मध्ये आणू नका, त्याचबरोबर कोणाला वैयक्तिक अडचणीत आणण्याचा प्रकार नाही. परंतु चुकीच्या पद्धतीने काम झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणाची मुख्याधिकारी चौकशी करतील, असे सभेत नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी जाहीर केले. त्याचबरोबर नगरअभियंता जीवन केंजळे यांच्यासह आणखी एका अधिकाऱ्याच्या समवेत चौकशी समिती नेमण्यात आली. मात्र, त्यामध्ये नगरसेवकांचा समावेश न झाल्याने समितीचा फार्सच ठरला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 9 lakhs of fraud?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.