दिव्यांग लाभार्थ्यांना ९ लाख ३६ हजार रुपये खात्यात रक्कम जमा, नगराध्यक्षा अंकिता शहा यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:12 IST2021-02-27T04:12:43+5:302021-02-27T04:12:43+5:30
या वेळी दिव्यांग संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब पाडुळे, अनंत गायकवाड, सचिन सूर्यवंशी, भोसले, अमीर शेख, रत्नपाल पाडुळे, योगेश ...

दिव्यांग लाभार्थ्यांना ९ लाख ३६ हजार रुपये खात्यात रक्कम जमा, नगराध्यक्षा अंकिता शहा यांचा सत्कार
या वेळी दिव्यांग संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब पाडुळे, अनंत गायकवाड, सचिन सूर्यवंशी, भोसले, अमीर शेख, रत्नपाल पाडुळे, योगेश उंडे, बापू शिंदे आदी उपस्थित होते.
दरवर्षी नियमित इंदापूर नगरपरिषदेच्या अंदाजपत्रकाच्या पाच टक्के रक्कम दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होत असल्याने या लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त करत इंदापूर नगरपालिका आणि नगराध्यक्षा, नगरसेवक, कर्मचारी यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
शासनाच्या सर्व योजना इंदापूर नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवित नागरिकांना लाभ देण्याचा प्रयत्न इंदापूर नगरपरिषदेचा असतो, अशी प्रतिक्रिया या वेळी नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी व्यक्त केली.
इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांचा सन्मान करताना दिव्यांग बांधव.