आखाडे यांच्या ९ मारेकऱ्यांना न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:11 IST2021-07-30T04:11:24+5:302021-07-30T04:11:24+5:30

रविवार (दि १८) रात्री ८.४५ वाजण्याच्या गारवा हॉटेलचे मालक रामदास रघुनाथ आखाडे यांचा खून करण्यात आला होता. त्यांच्या ...

9 killers of Akhade remanded in judicial custody | आखाडे यांच्या ९ मारेकऱ्यांना न्यायालयीन कोठडी

आखाडे यांच्या ९ मारेकऱ्यांना न्यायालयीन कोठडी

रविवार (दि १८) रात्री ८.४५ वाजण्याच्या गारवा हॉटेलचे मालक रामदास रघुनाथ आखाडे यांचा खून करण्यात आला होता. त्यांच्या हत्येप्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली होती. यातील १७ वर्षे ३ महिने वयाच्या अल्पवयीन मुलास बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. तर बाळासाहेब जयवंत खेडेकर (वय ५६), निखिल बाळासाहेब खेडेकर (वय २४, दोघे रा. खेडेकर मळा, उरुळी कांचन, ता. हवेली ), निखिल मंगेश चौधरी (वय २०), गणेश मधुकर माने (वय २०, दोघे रा. कोरेगावमूळ ता. हवेली), प्रथमेश राजेंद्र कोलते (वय २३, रा. उरुळी कांचन, ता. हवेली), अक्षय अविनाश दाभाडे (वय २७, रा. सोरतापवाडी, ता हवेली), करण विजय खडसे (वय २१, रा. माकडवस्ती, सहजपूर, ता. दौंड) व सौरभ कैलास चौधरी (वय २१, रा. खेडेकर मळा, ता. हवेली) व काजल चंद्रकांत कोकणे (वय १९, रा. बिबवेवाडी, पुणे) या ९ जणांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने गुरुवारी दिले आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश मधुकर आरते (वय २३, रा. तुकाईदर्शन, हडपसर, पुणे) हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याला पुणे शहर व पुणे जिल्हा हद्दीतून दोन वर्षांकरीता तडीपार केले आहे.

Web Title: 9 killers of Akhade remanded in judicial custody