सशस्त्र हल्ल्यातील ९ आरोपींना अटक

By Admin | Updated: August 25, 2014 05:19 IST2014-08-25T05:19:47+5:302014-08-25T05:19:47+5:30

दौंड तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष दादासाहेब शितोळे यांच्या कुसेगाव (ता. दौंड) येथील राहत्या घराव सशस्त्र हल्ला करुन चौघांना जखमी केल्या प्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली

9 accused in armed attack | सशस्त्र हल्ल्यातील ९ आरोपींना अटक

सशस्त्र हल्ल्यातील ९ आरोपींना अटक

पाटस : दौंड तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष दादासाहेब शितोळे यांच्या कुसेगाव (ता. दौंड) येथील राहत्या घराव सशस्त्र हल्ला करुन चौघांना जखमी केल्या प्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक एन.एम. सारंगकर यांनी दिली.
तुषार शितोळे (वय २४), श्रीकांत शितोळे (वय २४), निलेश शितोळे (वय २४), किरण शितोळे (वय २३), महेश शितोळे (वय २७), मच्छिंद्र शितोळे (वय ४८), सागर शितोळे (वय २१), विशाल शितोळे (वय २४) (सर्व राहणार कुसेगाव ता. दौंड) सोन्या उर्फ सुनिल शितोळे (रा. देऊळगावगाडा ता. दौंड) यांना अटक करण्यात आली आहे.
शुक्रवार (दि. १५) रोजी रात्री ११ वाजता आरोपींनी रस्त्यात मोटरसायकल आडवी लावली होती. या किरकोळ कारणावरुन दोन्ही कुटुंबातील व्यक्तींचा वाद झाला होता. त्यानंतर रात्री १ वाजता दादासाहेब शितोळे यांच्या घरावर सशस्त्र हल्ला करण्यात आला होता. (वार्ताहर)

Web Title: 9 accused in armed attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.