विद्यापीठाचे 8क्} निकाल 3क् दिवसांत
By Admin | Updated: June 28, 2014 22:58 IST2014-06-28T22:58:42+5:302014-06-28T22:58:42+5:30
येत्या 31 जुलैर्पयत सर्व निकाल व पुनमरूल्यांकनाचे निकाल जाहीर करून 8 ऑगस्टपासून परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

विद्यापीठाचे 8क्} निकाल 3क् दिवसांत
>पुणो : सुमारे दोन-अडीच वर्षापासून विविध परीक्षांचे निकाल उशिरा लावण्याबरोबरच इतरही काही कारणांमुळे चर्चेत राहणा:या पुणो विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने सुमारे 8क् टक्के निकाल 3क् दिवसांच्या आत जाहीर केले आहेत. तर, येत्या 31 जुलैर्पयत सर्व निकाल व पुनमरूल्यांकनाचे निकाल जाहीर करून 8 ऑगस्टपासून परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
पुणो विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ. व्ही. बी. गायकवाड म्हणाले, ‘‘परीक्षा विभागाने सुमारे 8क् टक्के विषयांचे निकाल 3क् दिवसांच्या आत जाहीर केले असून, प्रथम वर्ष अभियांत्रिकी 2क्क्8 पॅटर्न अभ्यासक्रमाचा निकाल शनिवारी (दि. 28) जाहीर केला असून, 2क्12 पॅटर्नचा निकाल येत्या सोमवारी प्रसिद्ध केला जाईल. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे निकाल केवळ 22 दिवसांमध्ये लावले आहेत. तसेच, अभियांत्रिकी तृतीय वर्षाचे निकालही पुढील तीन ते चार दिवसांत प्रसिद्ध केले जातील.’’
एम.कॉम. अभ्यासक्रमाचे निकाल 2 दिवसांत जाहीर होणार असून, एम.एस्सी. अभ्यासक्रमाचे पाच विषयांचे निकालही सोमवारी प्रसिद्ध होत आहेत, असे स्पष्ट करून गायकवाड म्हणाले, ‘‘परीक्षा विभागाने उर्वरित विषयांचे निकाल आटोक्यात आणले असून, एमबीए अभ्यासक्रमाचा निकाल शनिवारी (आज) प्रसिद्ध झाला. परंतु, एम.ए. अभ्यासक्रमाचे इंग्रजी विषयाचे शिक्षक कमी असल्याने त्या विषयाचा निकाल जाहीर करण्यास काहीसा वेळ लागल आहे. परंतु, विद्यापीठातर्फे लवरच या विषयाचा निकालही जाहीर केला जाईल.’’