महाड- पंढरपूर रस्त्याच्या कामासाठी ८६.४० कोटींचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:31 IST2021-01-08T04:31:34+5:302021-01-08T04:31:34+5:30
बाणकोट म्हाप्रळ, महाड ,भोर, शिरवळ प्ररामा १५ या रस्त्याची दर्जोन्नती होऊन सदर रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र.९६५ डी.डी.मध्ये रुपांतर ...

महाड- पंढरपूर रस्त्याच्या कामासाठी ८६.४० कोटींचा निधी मंजूर
बाणकोट म्हाप्रळ, महाड ,भोर, शिरवळ प्ररामा १५ या रस्त्याची दर्जोन्नती होऊन सदर रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र.९६५ डी.डी.मध्ये रुपांतर झाला आहे. या रस्त्याचे मजबूतीकरण व नूतनीकरण होण्यासाठी आमदार संग्राम थोपटे यांनी २०१७ रोजी अभियंता , राष्ट्रीय महामार्ग, कोकण भवन,नवी मुंबई यांचेकडे एकूण ५१/१८० कि.मी. लांबीची मागणी केली असता अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम पुणे यांचेकडील याच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वाढीव रकमेची मागणी केली होती. एवढेच नव्हे तर राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण यांचेकडे दि.२०/०२/२०२० रोजी वाढीव निधीची मागणी करून सातत्याने पाठपुरावा केल्याने खालील रस्त्याचे कामासाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
बाणकोट-म्हाप्रळ-महाड-भोर-पंढरपूर या रस्त्याच्या कामासाठी भोर हद्दीतील एकूण १२ कि.मी.च्या रस्त्यासाठी अर्थसंकल्प सन २०२०-२१ अंतर्गत ७.५० कोटी रकमेस मंजुरी मिळाली असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये वरंध घाटातील वाघजाई मंदिर, उंबार्डे, धारमंडप ते शिरगाव या गावच्या हद्दीतील रस्त्याचा समावेश आहे. याच रस्त्याच्या दुसऱ्या टप्यात २३ कि. मी. लांबीच्या रस्त्यासाठी रु. ९.७५ कोटी रकमेस राज्य (एस.आर.) रस्ते सुधारणा अंतर्गत मंजुरी मिळाली असून त्यामध्ये वारवंड, करुंगण फाटा, हिर्डोशी, धामणदेव मालुसरेवस्ती कोंढरी, वेनुपुरी, देवघर, निगुडघर, व आपटी या गावांचे हद्दीतील रस्त्यांचा समावेश आहे.
--
कोट
कामांचे श्रेय कोणी घेण्याचा प्रयत्न करू नये
अनेकवेळा पाठपुरावा करून आम्ही कामे मंजूर करून आणायची आणि सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवून मी केलेल्या कामांचे श्रेय घेण्याचे प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे रस्त्याचे कामाचे श्रेय लाटण्याचे प्रयत्न थांबवावा.
संग्राम थोपटे, आमदार