83% turnout for Gram Panchayats in Khed | खेडमध्ये ग्रामपंचायतींसाठी ८३ टक्के मतदान

खेडमध्ये ग्रामपंचायतींसाठी ८३ टक्के मतदान

जैदवाडी येथे दोन गटाच्या वादात काही काळ मतदान केंद्रात गोंधळ झाला होता. दोन गटाच्या वादात मात्र मतदान कर्मचारी यांना नाहक त्रास झाल्याचे पाहावयास मिळाले. पिपंरी बु येथे मतदानानंतर मतदान यत्रांसह निघालेले वाहनाला अडथळा करण्यात आल्याचे समजते. पोलिसांनी अधिकाऱ्यांनी सातत्याने दिवसभर पेट्रोलिंग करून चोख बंदोबस्त ठेवल्याने अनुचित प्रकार रोखण्यात पोलिसांना यश आले. सकाळी मतदानाअगोदर मतदान केंद्रात प्रतिनिधी समोर मोफपोल घेऊन सकाळी ७.३० वाजता उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. मतदान केंद्राबाहेर मात्र उत्साही कार्यकर्तेमुळे बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मात्र चांगलीच कसरत करावी लागली. आरोग्य विभागाच्या वतीने आशा वर्कर्समार्फत थर्मलस्कॅन,आॅक्सिमीटर, सॅनिटायझरचा मतदान केंद्रावर अभाव दिसुन येत होता.

येणिये बु्. येथे मतदार यादीतील नावावरून संभ्रम

तालुक्याच्या पश्चिम भागात येणिये बु.गावच्या प्रभाग तीन मधील मतदार यादीतील अनपेक्षित समावेश झालेल्या नावावरुन काही प्रतिनिधींनी आक्षेप घेतला. तोपर्यंत ९ जणांनी मतदान केले होते. तणाव निर्माण झाल्यामुळे मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवली. ही माहिती समजताच तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी मतदान केंद्रावर जाऊन दोन्ही गटांत झालेले मतदारयादीच्या नावातील संभ्रम दूर केल्यानंतर मतदान सुरळीत झाले.

दोन गावांत मतदान ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड

मतदानास सकाळी साडेसात वाजता सुरुवात झाल्यानंतर मोहकल येथील प्रभाग क्रमांक १ आणि तोरणे बु. येथील प्रभाग क्रमांक ३ मधील ईव्हीएम मशीन बिघाड झाल्यानंतर ही यंत्रं बदलून मतदान सुरळीत करण्यात आले. कोरोना लाॅकडाऊनमुळे बाहेरगावचे मतदार यात्रा जत्रा ना आणि सणांंना सुध्दा येऊ शकले नाही, असे मतदार ग्रामस्थांना खास आणण्याची व्यवस्था केल्याने गावात जत्राच भरल्याचे चित्र दिसत होते. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मात्र संपूर्ण गावातील ग्रामस्थ एकत्र आले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी खाद्यपदार्थाचे स्टाॅल लावण्यात आले होते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 83% turnout for Gram Panchayats in Khed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.