शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदांमध्ये ८३ कोटी रुपयांची अफरातफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 00:45 IST

राज्यभरातील विविध जिल्हा परिषदांमध्ये ८३ कोटी १७ लाख रूपयांची अफरातफर झाल्याची बाब पंचायतीराज संस्थांच्या लेख्यांवरील लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवालातून समोर आली आहे.

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : राज्यभरातील विविध जिल्हा परिषदांमध्ये ८३ कोटी १७ लाख रूपयांची अफरातफर झाल्याची बाब पंचायतीराज संस्थांच्या लेख्यांवरील लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवालातून समोर आली आहे. स्थानिक निधी लेखा विभागामार्फत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे लेखापरीक्षण केले जाते. पण या लेखापरीक्षणाला देखील अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लेखे, कागदपत्रे, अभिलेखे उपलब्ध करून दिले जात नाहीत. २०१५-१६ या वर्षाच्या लेखापरीक्षणासाठी निवडक ८६ जिल्हा परिषद विभागांचे व ११६ पंचायत समित्यांचे अभिलेखे उपलब्ध करण्यात आले नाहीत.

पुरेशी संधी देऊनही अभिलेखे सादर करण्यास प्रतिसाद दिला जात नाही, हा प्रकार गंभीर असल्याने ही बाब पंचायतराज समितीच्या निदर्शनास आणण्यात येत असल्याचे लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवालात म्हटले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये थेट १९६२-६३ पासूनची अफरातफरीची प्रकरणे निकाली न निघाल्याने प्रलंबित आहेत. या अहवालानुसार लबाडी, अपहार, अफरातफरीची ३१ मार्च २०१६ अखेर १७२८ प्रकरणे प्रलंबित होती. त्यात ८३ कोटी १७ लाख ८ हजार रूपये एवढी रक्कम गुंतलेली आहे. यात १९६२-६३ ते २०१०-११ पर्यंतची १६२८ प्रकरणे आहेत. त्यात १३ कोटी ९१ लाख रूपये अडकले होते.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी