शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या त्रासाला कंटाळून ८० वर्षीय ज्येष्ठाचा घटस्फोटासाठी दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 20:00 IST

प्रेम करण्यासाठी वयाची अट नाही असे म्हटले जाते. तसेच आता घटस्फोट घेवून विभक्त होण्यासाठीही वयाची अट राहिली नाही...

ठळक मुद्देपती शहरातील एका शिक्षण संस्थेचे संचालक तर पत्नी संस्थेच्या संस्थापिका व अध्यक्षाघटस्फोटाचे विविध प्रकारचे दावे दररोज कौटुंबिक न्यायालयात दाखल

पुणे : प्रेम करण्यासाठी वयाची अट नाही असे म्हटले जाते. तसेच आता घटस्फोट घेवून विभक्त होण्यासाठीही वयाची अट राहिली नसल्याचे कौटुंबिक न्यायालयात दाखल झालेल्या दाव्यातून पुढे आले आहे.     पतीच्या संपत्तीवर डोळा ठेवून त्यांना घराबाहेर काढण्यासाठी विविध मार्गांनी त्रास देणे, जेवण न देणे अशा प्रकारचा छळ पत्नीकडून सुरू आहे. तसेच तिचे गेल्या २० वर्षांपासून एका पुरुषाशी अनैतिक संबंध असा आरोप तक्रारदार पतीने केला आहे. तुकाराम आणि अलका असा या जोडप्याचे नाव आहे. तुकाराम यांचे वय ८० असून अलका या ७५ वयाच्या आहेत. त्यांचे जून १९९६४ साली लग्न झाले होते. तुकाराम हे शहरातील एका शिक्षण संस्थेचे संचालक आहेत तर अलका या संस्थेच्या संस्थापिका व अध्यक्षा आहेत. त्यांना दोन मुली असून त्या विवाहित आहेत. त्यातील एका मुलीची सॉफ्टवेअर कंपनी आहे. तर दुसरी गृहीणी. तुकाराम यांनी संस्थेच्या संचालक पदाचा राजीनामा द्यावा, म्हणून त्यांच्यावर पत्नीकडून दबाव टाकण्यात येत आहे. त्यासाठी त्यांना हृदयविकार असतानाही वेळेवर जेवण देणे, किचनला कुलूप लावून जाणे असे प्रकार करण्यात येत आहे. अलका यांच्या अनैतिक संबंधाबाबत विचारणा केली असता त्यांनी भांडण करून म्हातारड्या आता कायदा माझ्या बाजूने झाला आहे, हे लक्षात ठेव, अशी धमकी दिली. दरम्यानच्या काळात अलका यांनी गोड बोलून सर्व संपत्ती त्यांच्या नावावर करून घेतल्या, असे दाव्यात नमूद करण्यात आले आहे.     तक्रारदार यांना खर्चांसाठी पत्नीकडून दरमहा ५० हजार रुपये देण्यात येत होते. मात्र, तेही अचानकपणे देण्याचे बंद केले. जीवाचा धोका असल्याने अखेर त्यांना घटस्फोटासाठी अर्ज केला आहे, अशी माहिती त्याचे वकील आणि दी पुणे फॅमिली कॉर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अ‍ॅड. वैशाली चांदणे यांनी दिली. ............................तर तुझा खून करुन याच घरात गाडीन  सततच्या वादातून अलका यांनी तुकाराम यांना लाथाबुक्क्यांने व चपलेने मारहाण केली व घरातून हाकलून दिले. त्याबाबत जाब विचारला असता अलका यांनी धमकी दिली की, आता जर तू घरातून निघून गेला नाहीस तर तुला मी माझ्या मित्रांना घेऊन ठार मारेन व तुला ह्याच घरात गाडून टाकीन. राजकारण्यांशी माझे चांगले संबंध आहेत. .................घटस्फोटाचे विविध प्रकारचे दावे दररोज कौटुंबिक न्यायालयात दाखल होत आहे. ज्येष्ठांनी दावे केल्याची संख्या जास्त नसली तरी त्यांचे प्रमाण वाढले आहे. संपत्तीवर डोळा ठेवणे, पतीवर विश्वास नसणे, अनैतिक शंबंध, पती किंवा पत्नीच्या वाागण्यामुळे मुलांवर होणारा परिमाण या कारणामुळे ज्येष्ठ दावे करीत असतात. 

टॅग्स :PuneपुणेDivorceघटस्फोटCourtन्यायालय