शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील ८० टक्के विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेला तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 13:08 IST

अंतिम वर्षाचे १ लाख ८३ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

ठळक मुद्देअंतिम वर्षाची परीक्षा नियोजित वेळेत घेऊन ऑक्टोबर अखेरीस निकाल जाहीर करणे शक्य होणार

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील अंतिम वर्षाचे सुमारे ८० टक्के विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देण्यास तयार असून उर्वरित २० टक्के विद्यार्थीच ऑफलाईन पध्दतीने परीक्षा देणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाची परीक्षा नियोजित वेळेत घेऊन ऑक्टोबर महिना अखेरीस परीक्षेचा निकाल जाहीर करणे शक्य होणार आहे,असे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.      विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पुणे, अहमदनगर व नाशिक या तीनही जिल्ह्यांमधील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना १४ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने परीक्षा देण्याचा पर्याय निवडण्यासाठी विकल्प अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली होती. सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत विद्यापीठाकडे २ लाख ४८ हजार विद्यार्थ्यांपैकी २ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी विकल्प अर्ज भरला. त्यातील १ लाख ८३ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षेचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांसह ऑनलाईन पध्दतीने परीक्षा देण्यास पसंती दर्शविली आहे.त्यातही बरेच विद्यार्थी मोबाईलद्वारे परीक्षा देणार असल्याचे विद्यापीठातील अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. उर्वरित विद्यार्थी ऑफलाईन पध्दतीने परीक्षा देणार आहेत.   विद्यापीठातर्फे ऑनलाईन परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्नांची क्वेशन बँक तयार केली जात आहे. ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन ते तीन दिवस परीक्षेचा सराव करण्यासाठी अवधी दिला जाणार आहे. अंतिम वर्षाचा विकल्प अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुमारे २ लाख २४ हजार नियमित विद्यार्थी तर सुमारे २० हजार बॅकलॉगचे विद्यार्थी आहेत.विद्यापीठातर्फे येत्या १ ते ९ ऑक्टोबर दरम्यान बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांची परीक्षा तर १० ते २० ऑक्टोबर या कालावधीत नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. विद्यापीठाकडे विकल्प अर्ज भरलेल्या एकूण २ लाख २० हजार विद्यार्थ्यांमध्ये काही विद्यार्थी बॅकलॉकचे आहे.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयPune universityपुणे विद्यापीठ