शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

अपघातात जखमीला ८ लाखांची नुकसान भरपाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 17:41 IST

२९ मार्च २०१७ रोजी कांबळे फर्ग्युसन रस्त्याने जात होते. नो एंट्रीतून गेल्याने वाहतूक पोलिसांनी त्यांना अडवले. दंडाची रक्कम भरत असतानाच त्यांना एका चारचाकी वाहनाने मागून धडक दिली होती.

ठळक मुद्दे७ लाखांचा वैद्यकीय विमाही : महालोक अदालतीचा निर्णय

पुणे : वैद्यकीय विमा मिळाल्यानंतरही अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला सर्वसामान्य नुकसान भरपाई देखील मिळू शकते. शनिवारी झालेल्या महालोक अदालतीमध्ये असे एक प्रकरण निकाली काढण्यात आले आहे. जखमीला ७ लाखांचा वैद्यकीय विमा मंजूर झाल्यानंतरही त्याला ८ लाख रुपये सर्वसामान्य नुकसान भरपाई मिळाली आहे.    अपघातात जखमी झालेल्या प्रविण नारायण कांबळे (वय ३९) यांनी याप्रकरणी अ‍ॅड. जी. पी. शिंदे यांच्यामार्फत न्यू इंडिया इन्शुरन्स विरुद्ध दावा दाखल केला होता. लोक न्यायालयात हे प्रकरण निकाली काढत पॅनलला ८ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिले. २९ मार्च २०१७ रोजी कांबळे फर्ग्युसन रस्त्याने जात होते. नो एंट्रीतून गेल्याने वाहतूक पोलिसांनी त्यांना अडवले. दंडाची रक्कम भरत असतानाच त्यांना एका चारचाकी वाहनाने मागून धडक दिली. त्यात त्यांच्या डाव्या पायाला गंभीर जखम झाली होती. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या सर्व उपचारांसाठी एकूण ७ लाख रुपये खर्च आला. ही रक्कम वैद्यकीय विम्यातून मंजूर करण्यात आली होती.       कांबळे हे किचनची ट्रॉली बनविण्याचे काम करत अपघातामुळे ते सहा महिने झोपून होते. कांबळे यांच्या शेजारी राहत असलेल्या एका वकिलांने त्यांना सर्वसामान्य नुकसान भरपाईबाबत मार्गदर्शन केले. वैद्यकीय विमा मिळाल्यानंतरही जखमी व्यक्तीला सर्वसामान्य नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद असल्याचे वकिलांना त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार त्यांनी अ‍ॅड. शिंदे यांच्यामार्फत दावा दाखल केला होता. अपघात झाल्याने कामावर न जाता आल्याने झालेले नुकसान, कायमस्वरूपी अपंगत्व, देखभाल करण्यासाठी सतत बरोबर एक व्यक्ती थांबावी लागली (केअरटेकर) आणि रुग्णालयात ये-जा करण्यासाठी आलेला खर्च आदी बाबींचा समावेश करत बांबळे यांनी ८ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली.     अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला वैद्यकीय विम्यातून खर्च झालेली रक्कम मिळाले. मात्र, त्याचबरोबर त्यांच्या झालेल्या इतर नुकसानीची देखील  भरपाई मिळू शकते. अनेकांना याबाबत माहितीच नाही, असे अ‍ॅड. जी. पी. शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयAccidentअपघातMONEYपैसा