चंदननगरमधील २ टोळ्यांमधील ८ गुन्हेगार तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:12 AM2021-02-14T04:12:35+5:302021-02-14T04:12:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : चंदननगर परिसरात वारंवार दहशत पसरवून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांमधील ८ गुन्हेगारांना पोलीस उपायुक्त पंकज ...

8 criminals deported from 2 gangs in Chandannagar | चंदननगरमधील २ टोळ्यांमधील ८ गुन्हेगार तडीपार

चंदननगरमधील २ टोळ्यांमधील ८ गुन्हेगार तडीपार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : चंदननगर परिसरात वारंवार दहशत पसरवून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांमधील ८ गुन्हेगारांना पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी पुणे शहर, जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार केले आहे. या दोन टोळ्यांमध्ये ४ महिलांचा समावेश आहे.

सीमा हातागळे (वय ३५, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टी), रुक्मिणी ऊर्फ सिंधू संजय साळवे (वय ५०, रा. चंदननगर), प्रशांत हातागळे (वय १९, रा. समता सोसायटी, गणेशनगर, वडगाव शेरी), दिनेश चंद्रशेखर नायडू (वय ३४, रा. डॉ. आंबेडकर वसाहत, चंदननगर) अशी एका टोळीतील चार गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.

रेणुका वाघमारे (वय ४५, रा. आंबेडकर वसाहत, चंदननगर), मीना गोरख वाल्हेकर (वय ५०, रा. चंदननगर), गजानन भीमराव वानखेडे (वय ३३, रा. चंदननगर) आणि आकाश वाघमारे (वय २४, रा. चंदननगर) या चौघांनाही २ वर्षांसाठी पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले.

चंदननगर परिसरात या दोन्ही टोळ्यांविरुद्ध गुन्हे दाखल असून त्यांची परिसरात दहशत असल्याने त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यास नागरिक पुढे येत नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अब्दुल करीम सय्यद, पोलीस अंमलदार राजेश नवले, सचिन कुटे, सागर तारु यांनी तडीपाराची प्रस्ताव तयार केला होता. पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन ८ जणांना तडीपार करण्याचा आदेश दिला आहे.

Web Title: 8 criminals deported from 2 gangs in Chandannagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.