ओतूर परिसरात ८ कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:10 IST2021-03-19T04:10:44+5:302021-03-19T04:10:44+5:30

ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र कक्षेतील ओतूर शहर ५ ,बल्लाळवाडी १,तेजेवाडी ,१,उदापूर १ असे गुरुवारी एकूण ८ पाँझिटिव्ह रुग्ण सापडले ...

8 corona positive in Ootur area | ओतूर परिसरात ८ कोरोना पाॅझिटिव्ह

ओतूर परिसरात ८ कोरोना पाॅझिटिव्ह

ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र कक्षेतील ओतूर शहर ५ ,बल्लाळवाडी १,तेजेवाडी ,१,उदापूर १ असे गुरुवारी एकूण ८ पाँझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. परिसरातील बाधितांची एकूण संख्या ९६७ झाली असून त्यापैकी ८८१बरे झाले आहेत. ३१ जणांवर उपचार सुरु आहेत. ७ जण घरीच उपचार घेत आहेत.४८ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती ओतूर चे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते यांनी दिली .

गुरुवारी ओतूर शहरात एकदम ५ कोरोना बाधित सापडले आहेत, त्यामुळे ओतूर शहराची एकूण बाधितांची संख्या ४८६ झाली आहे .१५ जणावर उपचार सुरु आहेत .१ ,जण घरीच उपचार घेत आहे २४ जणांचा मृत्यू झाला आहे. बल्लाळवाडी येथे गुरुवारी १ कोरोना पाँझिटिव्ह मिळाल्याने तेथील बाधितांची संख्या ५४ झाली आहे .एक जणावर उपचार सुरू केले आहेत .२ जणांचा मृत्यू झाला आहे

.तेजेवाडी येथे १ रुग्ण सापडल्याने तेथील बाधितांची संख्या ४० झाली असून ३६ बरे झाले आहेत .३ जणावर उपचार सुरू केले आहेत .एकाचा मृत्यू झाला आहे.उदापूर येथील बाधितांची संख्या३८ झाली आहे .पैकी ३१ बरे झाले आहेत .२ जणावर उपचार सुरु केले आहेत .५ जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती डॉ. श्रीहरी सारोक्ते यांनी दिली .

Web Title: 8 corona positive in Ootur area