जिल्हा परिषदेसाठी ७५, पंचायत समितीसाठी १३४ अर्ज
By Admin | Updated: February 5, 2017 03:20 IST2017-02-05T03:20:57+5:302017-02-05T03:20:57+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवारी चौथ्या दिवशी गटांमध्ये ७५ अर्ज तर गणामध्ये १३४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. रविवारी सुट्टीच्या दिवशीदेखील निवडणूक

जिल्हा परिषदेसाठी ७५, पंचायत समितीसाठी १३४ अर्ज
पुणे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवारी चौथ्या दिवशी गटांमध्ये ७५ अर्ज तर गणामध्ये १३४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. रविवारी सुट्टीच्या दिवशीदेखील निवडणूक कार्यालय सुरू राहणार असून, उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारीविक्रांत चव्हाण यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या ७५ गटांसाठी व पंचायत समितीच्या १५० गणांसाठी येत्या २१ फेबु्रवारी रोजी मतदान होत आहे. यासाठी १ फेबु्रवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली सोमवार (दि. ६) हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे.
गेल्या चार दिवसांत जिल्हा परिषदेसाठी १०६ उमेदवारी
अर्ज तर पंचायत समितीच्या गणासाठी १७६ उमेदवारांनी अर्ज दाखल
केले आहेत.
- जिल्हा परिषदेच्या गटासाठी व पंचायत समिती निर्वाचक गणांसाठी (कंसात) दाखल झालेल्या अर्जांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे :
- जुन्नर- १७(३०), आंबेगाव-८(१५), शिरूर-१(७), मावळ-४(२), मुळशी-२(५), हवेली-१२(२२), दौंड-४(४), पुरंदर-१(१), वेल्हा-१(०), भोर-०(१), बारामती-९(१०), इंदापूर -७ (१५)