शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
2
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
3
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
4
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
5
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
6
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
7
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
8
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
9
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
10
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा
11
ऑफिसला या नाहीतर, कंपनीही सोडू शकता; गुगलचा 'वर्क फ्रॉम होम'बद्दल कठोर निर्णय
12
रेल्वे रुळावर बाईक पेटवली, रीलच्या नादात जीवघेणी स्टंटबाजी तरुणाला महागात पडली!
13
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय; आता हवे तेवढे टेरिफ लावू शकतात...
14
Sonam Raghuvanshi : "सोनमकडे २ फोन होते, सतत चॅटिंगमध्ये बिझी असायची"; राजाच्या वहिनीचा धक्कादायक खुलासा
15
शस्त्र परवाना मिळवण्यासाठी सादर केलेला भाडे करार खोटा; शशांकला १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी
16
BLOG: ‘बुलेट’ येईलच हो, पण आधी लोकल ‘ट्रॅक’वर आणा! इतके जीव जातात, तरी काहीच कसं वाटत नाही?
17
'सिद्धू मुसेवालाची हत्या करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता'; गोल्डी ब्रारने सांगितले हत्या करण्याचे कारण
18
WTC Final : रबाडाच्या भेदक माऱ्यानंतर चर्चेत आला बुमराह; जाणून घ्या त्यामागचं कारण
19
रेल्वेनं तिकीट बुकिंगचा नियम बदलला, आता आधारशिवाय बुक होणार नाही तत्काळ तिकीट; १ जुलैपासून लागू होणार नियम
20
सोनमच्या ‘बेवफाई’चा मेघालयला आर्थिक फटका, राजाच्या हत्येनंतर अनेकांनी रद्द केल्या बुकिंग्स...

२४ लाख ६१ हजारांच्या मोबदल्यात केले ७४ लाख ८३ हजार वसूल; बारामतीत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 15:24 IST

२०१५ मध्ये प्रताप जाधव याने वेगवेगळ्या व्यक्तिच्या नावाने चंकेश्वरा यांना २४ लाख ६१ हजार रुपयांची रक्कम व्याजाने दिली होती.

ठळक मुद्दे प्लॉट नावावर करण्याची मागणी करत  खंडणी मागत मारहाण करण्यात आल्याचा प्रकार

बारामती : शहरातील व्यावसायिकाकडून 24 लाख 61 हजारांच्या  बदल्यात ७४ लाख ८३ हजारांची रक्कम चक्रवाढ व्याजासह वसूल केल्याची तक्रार बारामती शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. रुपये परत केल्यानंतरही त्या व्यावसायिकाचा पुणे येथील प्लॉट नावावर करण्याची मागणी करत  खंडणी मागत मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे .पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , या प्रकरणी अनिकेत दिपक चंकेश्वरा (वय 35, रा .देसाई ईस्टेट )या कार डेकोर व्यावसायिकाने शहर पोलिसात फिर्याद दिली आहे .त्यानुसार प्रताप रमेश जाधव, विक्रम रमेश जाधव, राकेश रामकिसन वाल्मिकी व रुपेश रामकिसन वाल्मिकी या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आल आहे .२०१५ मध्ये प्रताप जाधव याने वेगवेगळ्या व्यक्तिच्या नावाने चंकेश्वरा यांना २४ लाख ६१ हजार रुपयांची रक्कम व्याजाने दिली होती. या बदल्यात चंकेश्वरा यांनी व्याजासह ३२ लाख ८३ हजार रुपये प्रताप जाधव याला परत केले. या रकमेव्यतिरिक्त मागील २५ महिन्यांपासून ते एप्रिल २०२० अखेरपर्यंत चक्रवाढ व्याज म्हणून चंकेश्वरा यांनी ४२ लाख रुपये दिले.चंकेश्वरा यांनी  ७४ लाख ८३ हजार रुपयांची रक्कम परत केली. शिवाय सिक्युरीटीपोटी जळोची हद्दीतील जमिन गट क्रमांक १६० मधील पाच गुंठ्याचा बिगर शेती प्लॉट खदीखत करून दिला.मात्र ,  व्याजासह पैसे परत केल्यांतर जळोची येथील हा जमिन व्यवहार परत नावावर उलटून देण्याचा ठरलेला व्यवहार प्रताप जाधव याने पूर्ण केला नाही. त्याच्या फॉर्च्युनर गाडीत  चौघांजणांनी चंकेश्वरा यास  बळजबरीने बसवून शहरातील माळावरची देवी येथे नेले. तेथे फिर्यादीला चाकूचा धाक दाखवत तुझा पुण्यातील आंबेगाव बुद्रूक येथील ३ माज्या नावावर कर तरच तुझा जळोचीतील पाच गुंठ्याचा 30लाख रुपयेप्रमाणे दीड कोटींचा  , तुझ्याकडून घेतलेले नऊ कोरे धनादेश तुला परत करतो, अशी धमकी आरोपींनी दिली. आंबेगावचा फ्लॅट नावावर केला नाही तर तुला मी जिवंत सोडणार नाही, तुझ्यावर व कुटुंबावर काहीजणांना पुढे करून खोटी अ‍ॅट्रॉसिटी करेन, अशी धमकी दिली. या व्यवहारापोटी प्रताप, विक्रम, राकेश व रुपेश यांनी फिर्यादीच्या दुकानात येत त्यांना मानसिक त्रास दिला. घरात घुसत हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिविगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे .दरम्यान , या  प्रकरणातील आरोपी  प्रताप जाधव याच्या विरोधात यापूर्वी देखील मार्च महिन्यात एक गुन्हा दाखल झाला आहे .जाधव याने  शहरातील  डॉ. बी. बी. निंबाळकर यांच्याकडे  ५० लाखांची खंडणी मागितली होती. तर डॉ. निंबाळकर यांच्याकडील कर्मचाऱ्याला जातिवाचक शिविगाळ केल्याप्रकरनी  पोलीस ठाण्यात खंडणी ,अ‍ॅट्रोसिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . त्यानंतर आज दाखल झालेला जाधव याच्यावर खंडणी व सावकारीचा दुसरा गुन्हा आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस