शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे यांची दादांविरूद्ध तक्रार, अमित शाह यांच्या उत्तराचा राऊतांकडून सस्पेन्स
2
वक्फ कायदा लागू झाल्यानंतर गावकऱ्यांना आली पहिली नोटीस; खाली करा नाहीतर कर द्या, तामिळनाडूत खळबळ
3
मृत्यूनंतर माणसाचे काय होते? आत्मा सात जगांच्या प्रवासाला निघतो...; ऑक्सफर्डच्या फिलॉसॉफरने सांगितले...
4
आता तुमच्या खात्यातून बायकोही करू शकणार पेमेंट; UPI मध्ये आलं नवीन फीचर
5
Beed: पाठलाग करून भाजपा पदाधिकाऱ्यावर कोयत्याचे वार, खुनाच्या घटनेने माजलगाव हादरलं
6
"एक घोळ झालाय, हा सूरज चव्हाणचा बायोपिक नाही", 'झापुक झुपूक' सिनेमाबाबत केदार शिंदेंचा मोठा खुलासा
7
राधिका मदानने केली सर्जरी? व्हायरल व्हिडिओवर म्हणाली, "आयब्रो आणखी वर हवे होते..."
8
IPL 2025: CSKच्या फॅन्सची चिंता वाढली! ऋतुराज पाठोपाठ MS धोनीलाही दुखापत? Viral Video मुळे चर्चा
9
NATO चा हल्ला झाला, तर सर्वात पहिले 'खाक' होणार 'हे' देश, रशियाची खुली धमकी!
10
नववर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी: बुधवारी गणेश पूजनाला विशेष महत्त्व; पाहा, महात्म्य, मान्यता
11
काय सांगता? तुमचा फोन चोरीला गेला, हरवला तरी आता नो टेन्शन; 'या' सोप्या स्टेप्सने शोधा झटपट
12
Vivah Muhurat 2025: १४ एप्रिलपासून पुन्हा सुरु झाले सनई चौघडे: डिसेंबरपर्यंतचे विवाह मुहूर्त जाणून घ्या!
13
द्वारका किती प्राचीन आहे? हे जाणून घेण्यासाठी, एएसआयने समुद्राखाली चालवली विशेष मोहीम
14
blinkit सोबत हातमिळवणी, Airtel चा शेअर बनला रॉकेट; दिसली जोरदार तेजी
15
पद, पगार चांगली; तरी लाचेची हाव वाढली; राज्यात ९७ दिवसांत २१५ लाचेचे गुन्हे दाखल
16
IPL 2025: MS Dhoni म्हणजे 'ब्रँड' ! उभं केलंय कोट्यवधींचं साम्राज्य; जाणून घ्या नेटवर्थ किती?
17
'या' लोकांना मिळणार नाही आयुष्मान कार्ड; तुमचे नाव तर यादीत नाही ना? असे तपासा ऑनलाईन
18
IPL 2025: CSKचा झेंडा घेऊन स्टेडियममध्ये जायचं नाही... लखनौमध्ये फॅन्सना आला विचित्र अनुभव (Video)
19
निर्णय चुकीचा..! पंचांचे 'निलंबन'; महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या वादग्रस्त निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब
20
Mangal Neptune Yuti 2025: २० एप्रिल रोजी तयार होणारा नवपंचम राजयोग उघडणार 'या' तीन राशींचे भाग्य!

७१ वर्षाच्या आजींनी सोनसाखळी चोरट्याला केला प्रतिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 15:48 IST

मोटारसायकलवरील चोरट्याने ७१ वर्षाच्या आजींच्या गळ्यातील सोनसाखळी व मंगळसुत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला.

पुणे :पायी जात असताना मोटारसायकलवरील चोरट्याने ७१ वर्षाच्या आजींच्या गळ्यातील सोनसाखळी व मंगळसुत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. पण, सावध असलेल्या महिलेने चोरट्याचा प्रतिकार केल्याने त्याने मोटारसायकल सोडून पळून जावे लागले. ही घटना बिबवेवाडीतील लोकेश सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावर शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी शालिनी शरद तिसगावकर (वय ७१, रा. लोकेश सोसायटी, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी या शनिवारी रात्री सोसायटीच्या आवारात फिरायला गेल्या होत्या. त्या घरी परतत असताना मोटारसायकलवरील एका तरुणाने त्यांना थांबवून पत्ता विचारला. त्याला पत्ता सांगत असताना त्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी व मंगळसुत्र हिसकाविण्याचा प्रयत्न केला. सावध असलेल्या तिसगावकर यांनी त्यांची सोनसाखळी पकडून आरडा ओरडा करायला सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून तेथील नितेश हा तरुण धावत आला. झटापटीत चोरटा मोटारसायकलवरुन पडला. गाडी टाकून तो पळून जाऊ लागला. त्याच्यामागोमाग नितेश चोर चोर म्हणत पाठलाग करु लागला. तेव्हा सोसायटीतील तीन तरुणांनी या चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने हातातील हेल्मेट त्यांच्या अंगावर फेकून पळ काढला. फिर्यादी यांच्या गळ्यातील अर्धी सोनसाखळी व मंगळसुत्र असा २२ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन चोरटा पळून गेला. पोलिसांनी मोटारसायकल व हेल्मेट जप्त केले असून पोलीस उपनिरीक्षक किरण देशमुख अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेThiefचोरChain Snatchingसोनसाखळी चोरीPoliceपोलिस