मुठा नदीतील ७० टक्के प्रदूषण मैलापाण्यामुळे - जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:08 IST2020-11-28T04:08:11+5:302020-11-28T04:08:11+5:30
जिवीतनदी या संस्थेने केलेल्या अभ्यासात नदीमध्ये घातक असलेले रसायने आढळून आले आहेत. यामुळे भविष्यकालीन संकट उभे राहू शकते. संस्थेने ...

मुठा नदीतील ७० टक्के प्रदूषण मैलापाण्यामुळे - जोड
जिवीतनदी या संस्थेने केलेल्या अभ्यासात नदीमध्ये घातक असलेले रसायने आढळून आले आहेत. यामुळे भविष्यकालीन संकट उभे राहू शकते. संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात क्रोमिअम, लेड, आर्सेनिक, कॉपर, कॅडमिअम, आयर्न, कॅलिफॉर्म खूप मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे. तर, डीडीटी, क्लोरीफ्रायडोफास, मोनोक्रोटोफास, पायरोफास, अॅस्ट्राझिन, डायड्रीन अशा विविध प्रकारच्या पेस्टीसाईडची मात्राही मोठ्या प्रमाणावर आढळून आली आहे.
====
वायफळ खर्च थांबवा
“नदीच्या एकूण प्रदुषणापैकी ७० टक्के प्रदुषण मैलापाणी सोडल्याने होते आहे. एसटीपी पूर्ण क्षमतेने काम करतात हे अर्धसत्य आहे. नदीच्या प्रवाहात मर्यादेपेक्षा अधिक रसायने आढळून येत आहेत. पालिकेच्या पंचवार्षिक योजनेत याविषयी नियोजनच करण्यात येत नाही. एकीकडे चुकीचे उड्डाणपूल, नको तिथे पदपथ बांधण्यावर खर्च होतो परंतु, आरोग्याच्यादृष्टीने महत्वाच्या नदीच्या प्रदुषणमुक्तीकडे दुर्लक्ष केले जाते.”
- शैलजा देशपांडे, जिवीतनदी
====
‘एसटीपींची धुळफेक’
एसटीपींची क्षमता कमी असल्याने सकाळच्या वेळेत प्रक्रिया न करताच सांडपाणी सोडून दिले जाते. दरवर्षी ठेकेदारांवर देखभाल-दुरुस्ती आणि प्रकल्प चालविण्यासाठी कोट्यवधी खर्च केले जातात. नाल्यांमधून मोठ्या प्रमाणावर मैलापाणी नदीत मिळतो त्याकडे दुर्लक्ष केले जाते. खरेतर शहरातील ओढे हे पावसाळी ओढे आहेत. या ओढ्यातून पावसाळ्यानंतर पाणी वाहणे अपेक्षित नाही. परंतु, वर्षभर या नाल्यांमधून मैलापाणी वाहते ज्यावर प्रक्रिया होत नाही.
- विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच