७० कोटींची विकासकामे

By Admin | Updated: September 29, 2014 05:48 IST2014-09-29T05:48:18+5:302014-09-29T05:48:18+5:30

मावळचे विद्यमान आमदार संजय तथा बाळा भेगडे यांनी या ५ वर्षांत मावळात सुमारे ७० कोटींची विकासकामे

70 crore development works | ७० कोटींची विकासकामे

७० कोटींची विकासकामे

तळेगाव दाभाडे : मावळचे विद्यमान आमदार संजय तथा बाळा भेगडे यांनी या ५ वर्षांत मावळात सुमारे ७० कोटींची विकासकामे केली असून, या सन २०१४-१५ साठी सुमारे १८ कोटी १३ लक्ष २० हजाराचे कामांना मंजुरी घेतली आहे. या आठ-दहा दिवसांत प्रत्यक्ष कामांना सुरुवात होईल, असे सांगण्यात आले.
या वर्षी केंद्रात भाजपा सरकार असल्याने प्रथमच केंद्रीय मार्ग निधी ५० कोटी २५ लाख पैकी ४ रस्त्यांसाठी १६ कोटी ३० लाख मंजूर झाले आहेत. सोमाटणे-शिरगाव-गोंडुब्रे-दारुंब्रे ते राष्ट्रीय महामार्ग (३ कोटी ८० लाख), वडगाव-कातवी-वराळे-माळवाडी ते राष्ट्रीय मार्ग ५५ (३ कोटी), दारुंब्रे-चांदखेड-आढले-डोणे ते काले कॉलनी (६ कोटी) व कामशेत-नाणे-गोविली-ते कोंडेश्वर मंदिर (३ कोटी ५० लाख) हे ते ४ रस्ते होय. लवकरच कामे सुरू होत आहेत. तर पंतप्रधान ग्राम सडक योजनेद्वारे (सन २०१२-१३) गेवंडे, शिळीम, मंगळूर पूल झाले असून, इंदोरी-नाणोली पूल लवकरच मार्गी लागेल. किवळे ते सावळा (७ कोटी ५८ लाख) रस्ता काम मार्गी लागले आहे तसेच सन २०१२-१३ मध्ये कान्हे रेल्वे उड्डाणपूल, देहूरोड सेंट्रल हॉटेल ते निगडी रस्ता रुंदीकरणास मंजुरी घेतली आहे. तसेच यावर्षी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग, उर्सेपासून मुंबई-पुणे जुना महामार्ग ते
तळेगाव स्टेशन ते माळवली (चाकण तळेगाव मार्ग) पर्यंत उड्डाणपुलास मंजूरी घेऊन ३ वर्षांत काम पूर्ण
होईल, असे आमदार भेगडे यांनी
स्पष्ट केले. (वार्ताहर)

Web Title: 70 crore development works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.