वारजेमध्ये ७ वाहनांची पुन्हा तोडफोड

By Admin | Updated: April 29, 2017 04:25 IST2017-04-29T04:25:22+5:302017-04-29T04:25:22+5:30

वारजे-माळवाडीत गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ७ ते ८ जणांच्या टोळक्याने काठ्या, हॉकी स्टिकने ६ चारचाकी व एका दुचाकी वाहनाची तोडफोड केली.

7 vehicles reopened in Warje | वारजेमध्ये ७ वाहनांची पुन्हा तोडफोड

वारजेमध्ये ७ वाहनांची पुन्हा तोडफोड

पुणे : वारजे-माळवाडीत गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ७ ते ८ जणांच्या टोळक्याने काठ्या, हॉकी स्टिकने ६ चारचाकी व एका दुचाकी वाहनाची तोडफोड केली. काही महिन्यांपूर्वी वारजे भागात वाहनांच्या तोडफोडीचे प्रकार घडले होते. त्यानंतर पुन्हा वाहनांचे नुकसान करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न टोळक्यांकडून करण्यात आला आहे.
वारजे पोलीस ठाण्यात याप्रकरणी शिवानंद करवीनकोप (वय २१, रा. श्रीराम हौसिंग सोसायटी, वारजे) यांनी फिर्याद दिली आहे. ७ ते ८ अज्ञात व्यक्तींविरुद्ध याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सात ते आठ जणांच्या टोळक्याने सोसायटीमध्ये प्रवेश करून सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या सहा चारचाकी व एक दुचाकीची तोडफोड केली.

Web Title: 7 vehicles reopened in Warje