भिगवणला दरोडेखोर महिलेसह ७ जण जेरबंद

By Admin | Updated: September 20, 2015 00:09 IST2015-09-20T00:09:32+5:302015-09-20T00:09:32+5:30

पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोड्याच्या तयारीत असलेल्या महिलेसह ७ दरोडेखोरांना पकडण्यात यश आले. चोरी करण्याच्या साहित्यासह सुमो गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.

7 people including a robber woman | भिगवणला दरोडेखोर महिलेसह ७ जण जेरबंद

भिगवणला दरोडेखोर महिलेसह ७ जण जेरबंद

भिगवण : पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोड्याच्या तयारीत असलेल्या महिलेसह ७ दरोडेखोरांना पकडण्यात यश आले. चोरी करण्याच्या साहित्यासह सुमो गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. भिगवण पोलिसांकडून झालेल्या कारवाईची परिसरात चर्चा होती.
बेळ्या काळे (वय ३९), मिथुन पवार (वय २२), नंद्या उर्फ लांड्या सूल्या पवार (वय २४), सचिन काळे (वय २५), सलीम शेख (वय ३२, सर्व जण रा. जवळफाटा, ता. जामखेड, जि. अहमदनगर), आयाज शेख (वय २५, रा. नुरानी कॉलनी, जामखेड), अबिती पवार (वय २५, रा. घोडेगाव, ता. जामखेड) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील पहिले तिघे जण अट्टल गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर इतर पोलीस ठाण्यांत गुन्ह्यांची नोंद आहे. शुक्रवारी रात्री गस्त घालत असताना भिगवण-राशीन रस्त्यावर पोलिसांना संशयित वाहन आढळले. त्यांची चौकशी केली असता चोरट्यांनी वाहनातून उड्या मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडे चोरी करण्यास उपयोगी पडणारे साहित्य मिळून आले. यामध्ये एक तलवार, दोन चाकू, नायलॉन दोरी, मिरची पूडचा समावेश होता. तसेच सुमो गाडीसह अंदाजे चार लाख रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

Web Title: 7 people including a robber woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.